ओळख लपवून महिलेशी लग्न केल्यास 10 वर्षांची जेल; केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये

टाइम्स मराठी । लव जिहाद या संदर्भात बऱ्याच राज्यांमध्ये कायद्यांचा अभ्यास सुरू आहे. यासोबतच भारतात देखील अशा प्रकारचा कायदा लागू होईल अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती. त्यानुसार आता सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इंग्रजांनी आणलेल्या दशकांपेक्षा जुना भारतीय दंड संहिता IPC बदलण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय न्यायिक संहिता BNS हे महत्त्वाचं विधेयक आणलं आहे. या विधेयकाच्या माध्यमातून लव्ह जिहाद आणि महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी तयारी सुरू आहे. या महत्त्वाच्या विधेयका नुसार, एखाद्या व्यक्तीने स्वतःची ओळख लपवून ठेवून एखाद्या महिलेसोबत लग्न केले किंवा प्रमोशन आणि नोकरीचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक संबंध ठेवले तर त्या व्यक्तीला 10 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो.

   

बऱ्याच वर्षापासून न्यायालयाने लग्नाच्या खोट्या आश्वासनाच्या आधारे बलात्कार केल्याच्या केसेस हाताळल्या असून IPC मध्ये यासाठी कोणतीही विशेष तरतूद नाही. जर एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून किंवा कोणताही फायदा न बघता एखाद्या महिलेसोबत लग्न करण्याचे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवले तर यापूर्वीच्या कायद्यानुसार ते बलात्काराच्या श्रेणीमध्ये येत नव्हते. परंतु सरकारने तयार केलेल्या नवीन विधेयकाच्या माध्यमातून ही घटना गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये येते. यामुळे दहा वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड देखील होऊ शकतो.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन विधेयके सादर केली. या विधेयकांमध्ये पहिल्यांदाच गुन्ह्यांना सामोरे जाण्यासाठीची विशिष्ट तरतूद प्रस्तावित करण्यात आली. त्यांनी 1860 च्या भारतीय दंड संहिता IPC वगळता भारतीय न्यायिक संहिता विधेयक लोकसभेमध्ये सादर केले. महिलांवर गुन्ह्याशी संबंधित तरतुदींवर विशेष लक्ष दिले गेले आहे. या विधेयकामध्ये महिलाविरुद्धचे गुन्हे आणि त्यांना होणारे काही सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. यासोबतच खोट्या आश्वासनाखाली महिलांशी शारीरिक संबंध निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देखील होऊ शकते. यासोबतच 18 वर्षाखालील मुलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं.

ज्येष्ठ फौजदारी वकील शिल्पी जैन यांनी या विधेयकावर सांगितले की, IPC भारतीय दंड संहितेनुसार यापूर्वीच्या कायद्यानुसार फसवणूक, ओळख लपवून लग्न करणे, या प्रकारच्या घटना बलात्काराच्या श्रेणीमध्ये येत नव्हत्या. त्यामुळे अशी प्रकरणे गुन्हा मानली जात नव्हती. आणि ही तरतूद दीर्घकाळ प्रलंबित देखील राहत होती. परंतु नवीन विधेयकाच्या माध्यमातून आता शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे गुन्ह्यांना आळा बसू शकतो. खोट्या नावाने आणि स्वतःची ओळख लपवून आंतरजातीय विवाह करणे यासाठी विशिष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. लव्ह जिहाद यामध्ये दोन शब्दांचा वापर केला जातो. लव्ह हा शब्द इंग्रजीमध्ये तर अरबी भाषेमध्ये जिहाद. यानुसार जेव्हा एखाद्या विशिष्ट धर्माचा व्यक्ती दुसऱ्या धर्मातील मुलीची फसवणूक करून तिला प्रेमात अडकवतो. आणि अंधारात ठेवून लग्न करतो. यानंतर तिला धर्म बदलवण्यासाठी प्रेरित करतो तेव्हा लव्ह जिहाद होते. आता अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.