धक्कादायक!! हिजाब नीट न घालणाऱ्या 14 विद्यार्थिंनींचे टक्कल केलं; कुठे घडली घटना?

टाइम्स मराठी । इंडोनेशिया (Indonesia)हा फार कठोर नियम असलेला देश नसला तरी देखील या देशाच्या काही भागांमध्ये महिलांसाठी कठोर ड्रेस कोड लागू करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी भारतातील कर्नाटकमध्ये बुरखाबंदी केल्यामुळे प्रचंड वाद उद्भवला होता. आता इंडोनेशियामध्ये हिजाब (Hijab) नीट न घातल्यामुळे 14 विद्यार्थिनींचे शिक्षकांनी मुंडन केल्याची घटना उघड झाली आहे. या संपूर्ण घटनेमुळे इंडोनेशियामध्ये खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर या घटनेला धार्मिक असहिष्णुते सोबत देखील जोडलं जात आहे. या घडलेल्या प्रकारानंतर शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

   

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना इंडोनेशियातील पूर्व जावा बेटावरील लमोंगन या शहरातील आहे. बुधवारी एका सरकारी शाळेमधील शिक्षकाने हिजाब नीट न घातल्यामुळे 14 मुलींचे अर्धे मुंडन केले. या मुलींनी हिजाबखाली असलेली टोपी घातली नव्हती. त्यामुळे त्यांचे केस दिसत होते. म्हणून रागाच्या भरात शिक्षकाने हे पाऊल उचलले. या घटनेनंतर 14 मुलींच्या कुटुंबाने गोंधळ घातल्यामुळे या शिक्षकाला निलंबित करण्यात आले. या सर्व कुटुंबीयांची माफी देखील मागण्यात आली. या शाळेतील मुख्याध्यापकांनी सांगितलं की, शाळेमध्ये हिजाब घालणे सक्तीचे नसले तरीही हिजाबच्या खाली असलेली कॅप घालण्याचा सल्ला देण्यात येतो. ज्यामुळे ते व्यवस्थित दिसेल. या घडलेल्या घटनेनंतर 14 विद्यार्थ्यांचे समुपदेशन देखील करण्यात आले. जेणेकरून त्यांना घडलेल्या घटनेतून सावरता येईल.

दरम्यान, इंडोनेशियामध्ये इस्लाम हा सर्वात मोठा धर्म आहे. सध्या या ठिकाणी पुराणमतवाद वाढत असून मुस्लिम बहुल भागातील शाळांमध्ये मुलींच्या ड्रेस कोड मध्ये हिजाब अनिवार्य करण्यात आला आहे. खास करून हा नियम सर्व धर्मातील विद्यार्थिनींना लागू करण्यात आलेला आहे. इंडोनेशियातील पूर्व जावा या ठिकाणी असलेल्या या शाळेत 14 मुलींनी हिजाब खाली असलेली कॅप घातली नसल्यामुळे त्यांचे केस दिसून येत होते. त्यामुळे शिक्षकांनी त्यांचे अर्ध मुंडन केले.