तुम्हीही चिप्स खाताय? सावध व्हा!! 14 वर्षाच्या मुलाचा झालाय मृत्यू

टाइम्स मराठी । अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या ‘वन चिप्स चॅलेंज’संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिखट चिप्स खाल्ल्याने एका 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमेरिका येथील मैसाचूसेट्स या ठिकाणी राहणाऱ्या 14 वर्षाच्या एका मुलाने इंस्टाग्राम वरील चॅलेंज पूर्ण करण्याच्या नादात स्वतःचा जीव गमावला आहे. या मुलाचे नाव harris Wolobah असे होते. या मुलाने जगातील सर्वात तिखट चिप्स खाल्ल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हे चिप्स खाल्ल्यानंतर त्या मुलाची तब्येत प्रचंड प्रमाणात खराब झाली. सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका चॅलेंजची ही चूक होती. याबाबत चीज बनवणाऱ्या कंपनीने हे चिप्स फक्त एडल्ट ला खाण्यासाठी बनवले होते.

   

सोशल मीडियावर सुरू असलेल्या चॅलेंज ला paqui Chips ने प्रमोट केले होते. वन चीप चॅलेंज असं या चॅलेंजच नाव होतं. या चॅलेंजमध्ये कोणताही पार्टिसिपेट ला एक पूर्ण टॉर्टीला चिप्स खाण्याचे चॅलेंज दिले होते. या चिप्स सोबत कोणतीच वस्तू खाऊ शकत नाही, आणि होऊ शकेल तेवढा वेळ पाणी न पिण्याचे सांगण्यात आले होते. या चॅलेंज नंतर त्यांना त्यांची रिएक्शन सोशल मीडियावर #onechipchallenge या हॅशटॅग सह कंपनीला टॅग करून पोस्ट करण्यास सांगितले होते.

harris Wolobah या मुलाच्या आईने सांगितलं की, त्याने स्कूलमध्ये हे चिप्स खाल्ले होते. त्यानंतर त्याच्या पोटामध्ये त्रास होऊ लागला. त्यानंतर मुलाला घरी पोहोचवण्यात आले. यानंतर त्याला चांगलं फील झालं परंतु त्यानंतर तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं परंतु त्याचा मृत्यू झालेला होता. मृत्यूचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. त्याचबरोबर अजून ऑटोपसीचे रिझल्ट आले नसून चीप मुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचं harris Wolobah च्या आईने सांगितलं.

हे चिप बनवणाऱ्या कंपनीने म्हणजेच Paqui ने वेबसाईटवर अगोदरच वार्निंग दिली होती, त्यांनी सांगितलं होतं की हे स्नॅक्स फक्त एडल्ट साठी बनवले आहे. हे खाल्ल्यानंतर सिरीयस मेडिकल इफेक्ट येऊ शकतात. त्याचबरोबर कंपनीने लोकांना हे खाल्ल्यानंतर कोणतीही समस्या , चक्कर येणे ,श्वास घ्यायला त्रास होणे किंवा उलटी सारखं फील झाल्यास डॉक्टरांना कन्सल्ट करण्याची माहिती दिली होती.