ऑगस्ट अखेरीस अवकाशात घडणार 2 मोठ्या घटना; पृथ्वी आणि शनी ग्रहाशी आहे संबंध

टाइम्स मराठी । ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अवकाशात २ मोठ्या घटना घडणार आहेत. 31 ऑगस्टला पौर्णिमेच्या दिवशी सुपरमून आणि ब्ल्यू मून दिसणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटी 27 आणि 28 ऑगस्टला अवकाशात सुंदर असा शनी ग्रह (Saturn) पृथ्वीच्या (Earth) जवळ येऊन तेजस्वी दिसणार आहे. 21 ऑगस्ट च्या पौर्णिमेला दिसणारा सुपरमून हा मोठा आणि जास्त प्रकाशमान दिसेल अशी माहिती खगोल अभ्यासकानी दिली आहे.

   

प्रत्येक वर्षी 378 दिवसानंतर शनी ग्रह हा पृथ्वीच्या कमी अधिक प्रमाणात जवळ येत असतो. या प्रक्रियेला अपोझिशन म्हणतात. म्हणजेच पृथ्वीच्या एका बाजूला सूर्य असेल तर दुसऱ्या बाजूला शनी ग्रह असेल. दर 29.5 वर्षांनी शनी ग्रह सूर्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. ही प्रदक्षिणा पूर्ण करत असताना पृथ्वी आणि शनी ग्रहाच्या अंतरामध्ये देखील बदल घडताना दिसतो. त्याप्रमाणे येत्या 27 ऑगस्टला शनी ग्रह कुंभ राशीत दिसणार आहे. यावेळी त्याचा आकार मोठा आणि 0.4 प्रती तेजस्वी दिसेल. यावेळी शनीची कडा 8.1 डिग्रीने झुकलेली दिसेल. आणि सूर्यास्त झाल्यानंतर शनी ग्रह हा पूर्वेला उगवताना दिसेल. शनि हा ग्रह पृथ्वीवरून अगदी सरळ रेषेत दिसणार असून सूर्य मागे असल्यामुळे शनिवारच्या वायूंचे वातावरण आणि शनीच्या कडांवर असलेले हिमकण चमकतील. यालाच सिलिगर इफेक्ट म्हणतात. हा इफेक्ट फक्त शनीच्या अपोझिशन वेळेस दिसतो.

एका वर्षात दिसतात चार सुपरमून

या महिन्यामध्ये एक ऑगस्टला सुपर मुन दिसला होता. त्यानंतर आता 31 ऑगस्टला हा दुसरा सुपरमॅन दिसणार आहे. हा ब्ल्यू मून रोज दिसणाऱ्या चंद्राच्या आकारापेक्षा सर्वात मोठा असेल. ज्या दिवशी सर्वात मोठा मून दिसेल, तेव्हा तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल. या ब्ल्यू मूनला सुपरमून देखील म्हटले जाते. एका वर्षामध्ये 4 सुपरमून दिसणार आहेत. यापैकी 3 जुलैला आणि 1 ऑगस्टला हा मून दिसला असून 31 ऑगस्ट आणि 29 सप्टेंबरला पुन्हा एकदा सुपरमुन दिसेल.असं नासाने सांगितलं आहे .

31 ऑगस्टला दिसेल सर्वात मोठा चंद्र

वैदिक शास्त्रानुसार पोर्णिमेला चंद्र हा 16 कलेने परिपूर्ण असतो. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा सर्वसाधारण दिवसांपेक्षा मोठा आणि चमकदार दिसतो. त्याच प्रकारे सुपरमून देखील अशाप्रकारेच दिसतो. सुपर मून किंवा ब्ल्यू मून ही एक अद्भुत घटना आहे. जेव्हा वार्षिक कॅलेंडरच्या महिन्यांमध्ये दोन वेळेस चंद्रमा दिसेल किंवा दोन वेळेस पौर्णिमा येईल तेव्हा ब्ल्यू मून किंवा सुपरमून म्हटला जातो. ब्ल्यू मून चा अर्थ निळा रंगाचा चंद्र नसून एक दुर्मिळ घटना आहे. एका महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास ब्ल्यू मून किंवा सुपरमून असल्याचे सांगण्यात येतं.

ज्योतिष शास्त्रानुसार ब्ल्यू मून किंवा महिन्यातून दोनदा पौर्णिमा येणे हे शुभ मानले जाते. यामुळे ध्येय पूर्ण करण्यासाठी फायदा होऊ शकतो. सुपरमून सकारात्मक ऊर्जेसह आपल्या जीवनात प्रकाश देखील देऊ शकतो. या काळात व्यक्ती त्यांच्या कामांमध्ये जास्त लक्ष देऊ शकतील. असं ज्योतिष शास्त्रांचा दृष्टिकोन आहे.