TikTok सारखे आणखी 2 अँप भारतात होणार लाँच; Instagram ला फटका बसणार?

टाइम्स मराठी । कोरोना महामारीच्या काळात टिक टॉक हे ॲप प्रचंड फेमस अँप झाले होते. टिक टॉक च्या माध्यमातून प्रत्येक जण व्हिडिओ बनवून शेअर करत होते. परंतु भारत सरकारने टिक टॉक सारख्या चिनी ॲप वर बंदी घातली घातल्याने टिक टॉकचा खेळच भारतात संपला. त्यानंतर इंस्टाग्राम भारतात मोठ्या प्रमाणात चालत असून लोक टिकटॉक ला विसरली सुद्धा. परंतु आता चिनी कंपनी टिक टॉक सारखे आणखीन दोन ॲप लॉन्च करणार आहे. हे दोन्ही ॲप इंस्टाग्राम ला टक्कर देऊ शकतात.

   

Bytedance ही चिनी कंपनी Resso आणि Lark हे दोन ॲप भारतामध्ये लॉन्च करण्याचे योजना बनवत असल्याचे उघड झालं आहे. भारतामध्ये एखादा ॲप किंवा मोबाईल यशस्वी लॉन्च झाल्यानंतर ते ॲप किंवा मोबाईल जगभरातील मार्केटमध्ये लॉन्च करण्यात येतात. त्यानुसार चिनी कंपनीचे ॲप भारतात लॉन्च झाल्यानंतर अमेरिका आणि युरोप सारख्या देशांमध्ये चिनी कंपनी त्यांचा व्यवसाय करू शकेल. भारतामध्ये चिनी ॲप वर बंदी घातल्यानंतर अमेरिकन युरोप येथील व्यवसायाची अवस्था विचित्र आहे. सरकारने तीन वर्षांपूर्वी tiktok सारखे बरेच ॲप बॅन केले होते.

चिनी ॲप टिक टॉक बॅन झाल्यानंतर इंस्टाग्राम ने लगेचच रिल्स च्या माध्यमातून व्हिडिओज बनवण्याचे ऑप्शन युजरला दिले. आता ही चिनी कंपनी Bytedance भारतात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. या कंपनीने भारतामध्ये दोन नवीन ॲप्स लॉन्च करण्याची प्लॅनिंग केली आहे. 2023 मध्ये कंपनीने Resso आणि Lark दोन ॲप लॉन्च करण्याची योजना आखली होती परंतु त्यासंदर्भात नंतरुन कोणतीच अपडेट आले नाही. आता पुन्हा कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. आता ही दोन ॲप भारतामध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत कंपनी आहे.

Resso आणि Lark हे दोन्ही ॲप ब्राझील आणि इंडोनेशिया मध्ये प्रचंड पॉप्युलर आहेत. या ॲपचे 125 मिलियन डाउनलोड देखील आहेत. हे दोन्ही ॲप भारतामध्ये लॉन्च झाल्यानंतर इंस्टाग्राम धोक्यात येऊ शकते. मात्र भारतामध्ये हे ॲप लाँच झाल्यानंतर सरकारच्या काही नियमांचे पालन कंपनीला करावे लागेल.