आकाशात दिसले 2 सूर्य; Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आणि फोटो शेअर केले जातात. यासोबतच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले बरेच व्हिडिओज मनोरंजन करतात तर काही आश्चर्यकारक असतात. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून शेअर किंवा पोस्ट करण्यात आलेले हे व्हिडिओज जगभरातील लोकांमध्ये सलेल्याअसलेले टॅलेंट दर्शवते. आता असाच एक विडिओ स्पशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये आपल्याला 2 सूर्य (2 Suns In Sky) दिसत आहेत. असं नक्की कस काय शक्य आहे हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात आला असेल. चला तर यामागील खरी परिस्थिती जाणून घेऊया.

   

पृथ्वीपासून (Earth) सर्वात जवळ असलेला तारा म्हणजे सूर्य (Sun) . त्यामुळे आपल्याला सूर्य हाच पूर्णपणे क्लिअर आणि मोठा दिसत असतो. त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे जगामध्ये एकच सूर्य आहे. आणि हा सूर्य सर्वांना दिसत असतो. परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन सूर्य दाखवण्यात आले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ह सत्य आहे की अफवा यावर चर्चा सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ समुद्रात जहाजाने प्रवास करणाऱ्या व्यक्तीने टिपलेला आहे. या व्हिडिओमध्ये पहिला सूर्य हा आकाशामध्ये चमकत असून दुसरा सूर्य हा ढगांमध्ये लपलेला दिसून येत आहे. कॅमेऱ्यात कैद झालेले हे अप्रतिम दृश्य पाहून तुम्हीही नक्कीच हैराण व्हाल . परंतु या व्हिडिओमध्ये दिसत असलेले २ सूर्य नसून एक सूर्य आणि एक चंद्र आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म instagram वर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ bluebookreptilian या अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून ‘ तुम्ही या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या २ सूर्या बद्दल काय विचार करताय ‘ असं कॅप्शन देण्यात आले आहे.