केंद्र सरकारकडून 20 लाख इंडक्शन स्टोव्ह आणि 1 कोटी पंख्याचे करण्यात येत आहे वाटप

टाइम्स मराठी । आज-काल विजेचा आणि ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. परंतु येणाऱ्या भविष्यात आपल्याला ऊर्जेची आणि विजेची टंचाई या समस्यांना मात करावी लागू शकते. आजकाल सर्व कामे विजेवर होत असल्यामुळे सर्वजण विजेवर अवलंबून झाले आहेत. परंतु ऊर्जा निर्मिती साधनांचे साठे हे मर्यादित आहेत. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ऊर्जेची बचत करण्यासाठी बरेच वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत आहे. जेणेकरून ऊर्जेचा आणि विजेचा वापर तुरळक प्रमाणात होईल. यासाठी सरकारकडून 20 लाख स्टोव आणि 1 कोटी पंख्याचे वाटप करण्यात येणार आहे.

   

या कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे वितरण

ऊर्जेची बचत व्हावी या दृष्टिकोनातून केंद्र सरकार कडून दोन कार्यक्रम  राबवण्यात येत आहेत. या कार्यक्रमाच्या अंतर्गत 20 लाख इंडक्शन स्टोव्ह आणि 1 कोटी पंख्याचे वाटप केले जाणार आहे. या वाटपासाठी केंद्र सरकारने EESL म्हणजेच एनर्जी एफिशियन्सी सर्विसेस लिमिटेड यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. जेणेकरून कंपनीकडून वीज आणि ऊर्जेचा वापर  कमी करण्यासाठी पाऊल उचलण्यात येईल.

हा आहे वितरणाचा मेन उद्देश

हे प्रॉडक्ट वितरित करण्यासाठी कंपनीकडून फॅन प्रोग्राम आणि दक्ष कुकिंग प्रोग्राम सादर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशात एक कोटी ब्रश लेस डायरेक्ट करंट पंखे  आणि 20 लाख इंडक्शन स्टोव वितरित केले जाणार आहे. हे इंडक्शन स्टोव्ह विजेची बचत आणि स्वयंपाकाचा खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. त्याचबरोबर कंपनीकडून  इंडक्शन स्टोव वितरित करण्याचा उद्देश हा  स्वयंपाकाची पद्धत पर्यावरण पूरक बनवणे, नागरिकांना स्वच्छ हवा आणि चांगले आरोग्य देणे हे आहे.

EESL म्हणजेच एनर्जी एफिशियन्सी सर्विसेस लिमिटेड या कंपनीने  इंडक्शन स्टोव्ह चा मोठ्या प्रमाणात वापर व्हावा यासाठी मॉडर्न एनर्जी कुकिंग सर्विसेस सोबत पार्टनरशिप केली आहे. जेणेकरून देशातील स्वयंपाक घरांमध्ये आधुनिक इलेक्ट्रिक प्रॉडक्ट वापरण्यात येईल. आणि या प्रॉडक्ट च्या वापराला गती मिळेल. त्याचबरोबर हे वितरित करण्यात येणारे  इंडक्शन स्टोव्ह स्वयंपाकाच्या खर्चामध्ये  25 ते 30 टक्के बचत करतात. या सोबतच विजेची बचत देखील होईल.

सिलिंग पंखा

या कार्यक्रमाच्या माध्यमातून इंडक्शन स्टोव सोबतच कमीत कमी ऊर्जेचा वापर होणारे सिलिंग पंखे देखील वितरण करण्यात येणार आहे. हे पंखे उर्जेच्या वापरा सोबतच विज बिल देखील कमी करण्यास सक्षम असतील. यासोबतच पर्यावरणीय प्रभाव देखील या पंख्याच्या वापरामुळे कमी होऊ शकतो. हे सिलिंग पंखे नागरिकांना पूरक हवा देतील. या पंख्यांच्या माध्यमातून  कार्बन उत्सर्जनामध्ये घट होऊ शकते. यासोबतच 12,000 वॉट विजेची मागणी देखील कमी होण्यास मदत होईल. आणि सरकारचा निर्णय हा महत्त्वपूर्ण सिद्ध होईल.