2000 Rs Note : सोने खरेदी करताय? तुम्हीही ‘ही’ चूक करत नाहीये ना?

टाईम्स मराठी टीम । 2014 मध्ये पीएम मोदींनी नोटबंदी आणली होती. त्यावेळी 500 आणि 1000 च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या. आता काही दिवसांपूर्वी मोदींनी 2000 च्या नव्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोलपंप, दुकान, मॉल अशा इतर ठिकाणी कुठेही 2000 च्या नोटा ग्राहकांकडून घेतल्या जात नाहीये. यातच आता RBI ने भारतीय रिजर्व बँक ने 2000 रुपये परत घेणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर दिल्ली मध्ये 2000 रुपये घेऊन काळा बाजार होत असल्याचं उघड झालं.

   

भारतीय रिजर्व बँक ने पैसे परत घेण्यासाठी काही नियम आणि अटी घातल्या होत्या. परंतु दिल्ली येथील ज्वेलर्स यांनी त्या नियमांना पायदळी तुडवून सोने विकले. जेणेकरून 2000 रुपये मोडल्या जातील आणि त्याचा फायदा ज्वेलर्सला होईल. रिपोर्ट नुसार, दिल्लीतील ज्वेलर्स यांनी 2000 च्या नोटा अशा 25 लाख रुपये कॅश घेऊन सोने विक्री केली. त्याचबरोबर नकली बिल देखील त्यांनी बनवले होते.

प्रिव्हेशन ऑफ मनी लॉडिंग ऍक्ट यानुसार 2020मध्ये कॅश देऊन सोने खरेदी करण्यासाठी नियम आणि अटी लागू केल्या होत्या. त्या अटीनुसार जर एखादा व्यक्ती 10 लाख पेक्षा जास्त पैसे कॅश देऊन सोनं खरेदी करत असेल तर त्याला kyc करावी लागते. आणि सरकारी कर्मचाऱ्यांना याची माहिती देखील द्यावी लागते. परंतु दिल्लीतील ज्वेलर्स यांनी या नियमांना पायदळी तुडवत कॅश घेऊन विना kyc सोने विकले. त्याचबरोबर आयकर अधिनियम 1961 कलम 269ST यानुसार तुम्ही 2 लाख पेक्षा जास्त पैसे देऊन सोनं खरेदी करू शकत नाही. त्याचबरोबर तुम्ही 2 लाख आणि त्यापेक्षा जास्त खरेदी देखील करू शकत नाही.