2024 Kawasaki Eliminator 500 भारतात लाँच; पहा किंमत आणि फीचर्स

2024 Kawasaki Eliminator 500 । आपल्या भारतात स्पोर्ट आणि रेट्रो लूक वाल्या बाईकची चांगलीच चलती आहे. खास करून तरुण वर्गाला अशा आकर्षक बाईक खूप पसंत असतात. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या स्पोर्ट बाईक अपडेटेड फीचर्स सह बाजारात आणत असतात. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी Kawasaki ने 2024 Kawasaki Eliminator 500 भारतात लाँच केली आहे.ही बाईक दिसायला अतिशय आक्रमक आणि आकर्षक आहे. 5.62 लाख रूपयांच्या एक्स शोरूम किमतीत कंपनीने ही बाईक उपलब्ध केली असून मार्केट मध्ये ती Royal Enfield Super Meteor 650 ला टक्कर देईल.

   

लूक आणि डिझाईन –

गाडीच्या लूक आणि डिझाईन बद्दल सांगायचं झाल्यास, 2024 कावासाकी एलिमिनेटर 500 अतिशय मॉडर्न अशा क्लासिक क्रूझरसारखी दिसते. 2024 Kawasaki Eliminator 500 चे वजन 176 किलो आहे. या बाईकची लांबी 2,250 मिमी, रुंदी 785 मिमी आणि उंची 1,100 मिमी आहे. या बाईकला देण्यात आलेल्या सीटची उंची 735 मिमी असून 150 मिमी ग्राउंड क्लीयरन्स मिळतो.

इंजिन – 2024 Kawasaki Eliminator 500

गाडीच्या इंजिनबाबत सांगायचं झाल्यास, Kawasaki Eliminator 500 मध्ये 451 cc समांतर-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 9,000 rpm वर 44 bhp पॉवर आणि 6,000 rpm वर 46 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेल आहे.

या बाईकला एक गोलाकार एलईडी हेडलॅम्प, एक्सपोज़्ड फ्रेम देण्यात आली आहे. या बाईक मध्ये स्पीडोमीटर, टॅकोमीटर, फ्युएल गेज, गियर पोझिशन इंडिकेटर आणि 2 ट्रिप मीटर देखील देण्यात आले