2024 KTM 790 Adventure जागतिक बाजारात लाँच; मिळतायत दमदार फीचर्स

टाइम्स मराठी । KTM या टू व्हीलर निर्माता कंपनीने ग्लोबल मार्केटमध्ये स्टायलिश ऍडव्हेन्चर बाईक लॉन्च केली आहे. KTM कंपनीकडून भारतीय मार्केटमध्ये हाय स्पीड आणि पावरफुल बाईक्स लॉन्च केले जातात. या कंपनीने नुकतेच लॉन्च केलेल्या एडवेंचर बाईकचे नाव 2024 KTM 790 Adventure आहे. कंपनीने ही बाईक मोठ्या इंजिन पॉवरसह लॉन्च केली आहे. लवकरच ही बाईक भारतीय बाजारपेठेत देखील लॉन्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज आपण जाणून घेऊया या बाईकचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

पावरट्रेन– 2024 KTM 790 Adventure

2024 KTM 790 Adventure ही हाय पावर बाईक आहे. यामध्ये 799 CC लिक्विड कुल्ड इंजिन मिळते. हे इंजिन 93.8 bhp पावर आणि 87 NM पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्स ने सुसज्ज आहे. KTM ने इंजिन लॉंग रूट वर उच्च कार्यक्षमतेसाठी डिझाईन केले आहे.

सस्पेन्शन

2024 KTM 790 Adventure या बाईकमध्ये स्लीपर क्लच, टू वे क्विक शिफ्टर देण्यात आले आहे. जेणेकरून बाईक चालवताना रायडरला आरामदायक अनुभव मिळेल. कंपनीने बाईक मध्ये नवीन एअरबॉक्स दिले आहे. जेणेकरून बाईकचा परफॉर्मन्स वाढेल. रोड एक्सीडेंट पासून वाचण्यासाठी बाईक मध्ये ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आले आहे. कंपनीने बाईक मध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिमचा वापर केला असून सेंसरच्या माध्यमातून बाईकला कंट्रोल करण्यास मदत होईल. या बाईकच्या फ्रंट मध्ये WP एपेक्स सस्पेन्शन आणि रियर मध्ये प्रीलोड ऍडजेस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहे. 

कनेक्टिव्हिटी फीचर्स

2024 KTM 790 Adventure बाईक मध्ये सर्व LED लाईटचा वापर करण्यात आला आहे. यासोबतच बाईकमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, TFT डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेवर कॉल, म्युसिक, नेव्हीगेशन पाहता आणि नियंत्रित करता येतील. KTM ने बाईकचा लुक जास्त आक्रमक ठेवला आहे. ही न्यूली लॉन्च बाईक यामाहा टेनेर 700 आणि BMW F850 GS या बाईक सोबत प्रतिस्पर्धा करेल.