2024 Renault Duster SUV कधी लाँच होणार? समोर आली मोठी अपडेट

2024 Renault Duster SUV । Renault कंपनीने थर्ड जनरेशन Renault Duster SUV चे वर्ल्ड प्रीमियर नुकतेच पोर्तुगाल मध्ये लाँच केले आहे. कंपनी हे नवीन मॉडेल पुढच्या वर्षी युरोपीय मार्केटमध्ये लॉन्च करणार आहे. त्यानंतर ही SUV भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येईल. कंपनीने भारतामध्ये ही SUV लॉन्च करण्याबाबत कोणत्याच टाइमलाईनची घोषणा केलेली नसून 2025 च्या सुरुवातीला ही SUV भारतात लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या SUV च्या डिझाईन, फीचर्स, अंडरपिनिंग्स आणि पावरट्रेनमध्ये कंपनीने बरेच बदल केले आहेत. जाणून घेऊया या SUV मध्ये देण्यात येणारी फीचर्स आणि स्पेसिफिकेशन.

   

इंटरियर डिझाईन

2024 Renault Duster SUV या थर्ड जनरेशन अपकमिंग  SUV मध्ये  कंपनीने बरेच बदल केले आहेत. या SUV च्या इंटेरियर बद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये लाईट आणि डार्क ब्राऊन कलर मध्ये ड्युअल टोन डॅशबोर्ड लेआउट मिळेल. यासोबतच हाय ट्रिमला ड्युअल डिजिटल स्क्रीन सेटअप मिळेल. यामध्ये ड्रायव्हरला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर साठी 7 इंच डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंट  सिस्टीम साठी 10.1 इंच टचस्क्रीन देण्यात येईल. 

फिचर्स– 2024 Renault Duster SUV

2024 Renault Duster SUV मध्ये इंटेरियर सेंट्रल कन्सोल सह ड्रायव्हर सेंट्रिंक असेल. यामध्ये HVAC सिस्टीम सोबतच बऱ्याच बटनासह एसी व्हेंटच्या खाली होरायझेंटल पॅनल असेल. या अपकमिंग  2024 रेनॉल्ट डस्टर मध्ये  इंडिग्रेटेड कंट्रोल सह 3 स्पोक स्टिअरिंग व्हील, 12V पावर सॉकेट, USB पोर्ट यासारखे फीचर्स देण्यात येतील. याशिवाय इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स यासारखे ऍडव्हान्स फीचर्स देखील टॉप ट्रीम्स मध्ये बघायला मिळतील.

सेफ्टी फिचर्स

2024 Renault Duster SUV या नवीन डस्टर मध्ये ADAS टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. यामध्ये लेन चेंज अलर्ट, हाय स्पीड अलर्ट, ट्रॅफिक साइन रिकॉग्निशन, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, व्हिकल रिकॉग्निशन, लेन चेंज असिस्ट, रियल पार्किंग असिस्ट यासारखे सेफ्टी फीचर्स देण्यात येतील.

बूटस्पेस 

2024 Renault Duster SUV मध्ये मोठा बूट स्पेस मिळणार आहे. ही SUV नवीन CMF B प्लॅटफॉर्मवर डेव्हलप करण्यात आली आहे. ही अपकमिंग SUV डेसिया बिगस्टर कन्सेप्ट वर प्रेरित आहे. ही SUV 4.34 मीटर लांब असून स्पोर्टी लूक ऑफर करेल.

पावरट्रेन 

2024 Renault Duster SUV काही दिवसांपूर्वी ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली. यावेळी या नवीन SUV मध्ये 3 इंजिन ऑप्शन देण्यात  आले. यामध्ये 1.6 लिटर पेट्रोल हायब्रीड इंजिन मिळते. हे इंजिन ड्युअल इलेक्ट्रिक मोटरसह येते. दुसरे इंजिन ऑप्शन 1.2 लिटर , 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि काही मार्केटसाठी 1.0 लिटर पेट्रोल एलपीजी इंजिन यामध्ये मिळते. यासोबतच तिसरे इंजिन ऑप्शन म्हणजे 1.2 लिटर माइल्ड हायब्रीड इंजिन. हे इंजिन 4×2 आणि 4×4 ड्राइव्हट्रेन सिस्टीम सह उपलब्ध होईल. या सोबतच  1.2 kwh बॅटरी पॅक सोबत 48 V स्टार्टर मोटर देखील यामध्ये देण्यात आली आहे. त्यानुसार ही मोटर 130 BHP पावर जनरेट करते.