2024 Year Predictions : 2024 मध्ये घडणार असं काही…. भविष्यवाणी करणाऱ्या व्यक्तीने लोकांना दिला सावध राहण्याचा इशारा  

2024 Year Predictions । आपल्यापैकी बरेच व्यक्ती हे भविष्यवाणीवर विश्वास ठेवत असतील. काही व्यक्तींनी केलेली भविष्यवाणी खरी असते असं बऱ्याच जणांचं मत असतं. आता आणखीन एका व्यक्तीने भविष्यवाणी करत लोकांना सावधान राहण्यास सांगितले आहे. कारण 2024 मध्ये असं काही घडणार आहे, जे  लोकांसाठी भयानक आहे. असं या व्यक्तीचं मत आहे. या व्यक्तीने यापूर्वी देखील भविष्यवाणी केली होती. 

   

एथॉस सेलोमे ATHOS SALOME असं या भविष्यवाणी केलेल्या (2024 Year Predictions) व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती ब्राझील येथील रहिवासी असून त्याने आता पर्यंत केलेल्या भविष्यवाणीमुळे त्याला नास्त्रेदमस देखील म्हटले जाते. या व्यक्तीने केलेले बरेच दावे खरे देखील ठरले आहे. एथॉस सेलोमे याने मागच्या वर्षी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूबद्दल देखील भाष्य केले होते. एवढेच नाही तर एलन मस्क हे ट्विटरचे नाव बदलतील याबाबत देखील त्यांनी पूर्वीच सांगितले होते.

2024 मध्ये लोकांना सावध राहण्याचा इशारा –  2024 Year Predictions

डेली स्टार सोबत बोलताना एथॉस सेलोमे यांनी लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. डेली स्टार सोबत बोलताना त्यांनी सांगितलं की, आर्टिफिशल इंटेलिजन्स  सीसीटीव्ही ची पावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  चीन आणि अमेरिका या ठिकाणी डेव्हलप करण्यात येत असलेली  फेशियल रिकॉग्निशन  टेक्नॉलॉजी असे युग  डेव्हलप करेल ज्यामुळे कोणतीच प्रायव्हसी राहणार नाही. एथॉस सेलोमे यांनी सांगितलं की, आपण झपाट्याने अशा वास्तवाकडे जात आहोत ज्या ठिकाणी गोपनीयता ही सरकार आणि कॉर्पोरेशनला लोकांच्या वैयक्तिक माहिती मध्ये प्रवेश देणारी संकल्पना बनेल.  (2024 Year Predictions)

एथॉस सेलोमे यांनी केलेल्या दाव्यापूर्वी एक बातमी आली होती. या बातमीच्या माध्यमातून रशिया देशभरामध्ये 50 लाख कॅमेरे लावेल अशी माहिती मिळाली होती. राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन देशातील नागरिकांची सेक्युरिटी वाढवतील असं देखील या बातमीमध्ये सांगण्यात आले होते. रशिया चे डिजिटल विकास मंत्रालय पूर्ण सिस्टीमला केंद्रीकृत करू इच्छित आहे. जेणेकरून क्रेमलीन म्हणजेच रशियाचे राष्ट्रपतीचे कार्यालयमध्ये बसलेल्या लोकांना फुटेज मिळेल. लोकांची पर्सनल इन्फॉर्मेशन जमा करून वापरण्यात येत असल्याचं सांगत एथॉस सेलोमे यांनी लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.