समुद्रकिनारी 34 वर्षांपूर्वीची बाटली अन बाटलीत सापडली ‘ती’ चिठ्ठी; तरुणीने सांगितला वेगळाच अनुभव

टाइम्स मराठी । कॅनडा येथील समुद्र किनाऱ्यावर एक अशी घटना घडली आहे. ज्यावर आपण विश्वास ठेवू शकत नाही. येथील एका समुद्रकिनाऱ्यावर फिरणाऱ्या एका महिलेला ३४ वर्षांपूर्वीची जुनी बॉटल सापडली. विशेष म्हणजे या बाटलीत एक चिठ्ठी देखील होती. चिट्टीत नेमकं काय होत हे पाहून तिलाही चांगलंच आश्चर्य वाटलं. ट्रुडी शॅटलर मॅककिनन असं या सदर महिलेचं नाव असून तिने याबाबतचे फोटो आपल्या फेसबुक अकाउंट वर शेअर केले आहेत.

   

शॅटलर नावाची ही महिला तिच्या सासू-सासऱ्यांसोबत समुद्रकिनाऱ्यावर जात असताना तिला ही बॉटल आणि चिट्ठी मिळाली. ही चिट्ठी 29 मे 1989 म्हणजेच 34 वर्षांपूर्वीची आहे. या बाबत तिने फेसबुकवर बॉटल, त्यामध्ये सापडलेली चिठ्ठी, व्हिडीओ आणि काही ओळी लिहून पोस्ट केला. या पोस्टमध्ये ती म्हणते की, आज समुद्रकिनाऱ्यावर जात असताना मला एक बॉटल मिळाली त्यामध्ये चिठ्ठी होती. या चिठ्ठी मध्ये लिहिलं होतं की, पोर्ट ऑक्स चॉईक्स मधील फॉक्स पॉईंट पासून १० मैल अंतरावरून ही बॉटल पाण्यात टाकलेली आहे.

8e321f42 e245 4fa5 97d5 121fa095372c 1

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ती पुढे म्हणते, “मौसम मस्ताना होता, वारा नव्हता, त्या चिठ्ठीवर तारीख 29 मे 1989 होती. म्हणजेच ही बाटली 34 वर्ष जुनी असून मला या व्यक्तीकडून पाण्यात फेकलेली असावी. ही बाटली पाण्यात टाकणाऱ्या व्यक्तीकडून मला ऐकायला आवडेल. मी प्रोफेशनल बीचकॉम्बर आहे .मला नेहमी आत संदेश असलेली बाटली शोधायची होती. मी चित्तथरारक काही फोटो देखील जोडले आहेत. ही पोस्ट पाहून सोशल मीडिया युजर्सने बऱ्याच कमेंट केल्या त्यापैकी एका योजना लिहिलं की, या कथेने मल्हार रोमँटिक आणि जुन्या दिवसात परत नेलं. तर दुसरा युजर्स म्हणतो की सर्वोत्तम कथा….