टाइम्स मराठी । तुम्ही कधी पोस्ट ऑफिस मध्ये गेला आहात का? जर तुम्ही त्या ठिकाणी गेले असाल तर तुम्हाला प्रचंड गर्दी, त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी अधिकारी दिसतात. साधारणतः नॉर्मल बिल्डिंग आपण पोस्ट ऑफिस ची पाहतो. परंतु आता बेंगलोर मध्ये थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी च्या (3D Printed Post Office) माध्यमातून पोस्ट ऑफिस तयार करण्यात आले आहे. हे पोस्ट ऑफिस थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी वापरून बनवले असून प्रिंटिंगच्या दुनियेमध्ये भारताने पहिल्यांदाच हा नवीन विक्रम केला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले. याबाबत अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती देत या बिल्डिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे.
यावेळी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये नवीन टेक्नॉलॉजी विकसित होत आहे. त्यानुसारच बेंगलोर मध्ये बांधकाम करण्यात आलेली ही थ्रीडी प्रिंटेड बिल्डिंग (3D Printed Post Office) ही भारताची भावना आहे. याच भावनेने भारत आता प्रगती करत आहे. बेंगलोर हे असं शहर आहे की ते नेहमीच भारताचे नवीन चित्र मांडत असते. देशाकडे एक निर्णयात्मक नेतृत्व असल्यामुळे हे शक्य होऊ शकते असं देखील त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या पोस्ट ऑफिसचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी म्हंटल, केंब्रिज लेआउट, बेंगळुरू येथे भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस पाहून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. हे 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस आपल्या देशाच्या नवकल्पना आणि प्रगतीचा दाखला, ते आत्मनिर्भर भारताच्या भावनेला देखील मूर्त रूप देते. पोस्ट ऑफिसच्या पूर्णत्वाची खात्री करण्यासाठी ज्यांनी कठोर परिश्रम घेतले त्यांचे अभिनंदन.
काय आहेत वैशिट्ये – (3D Printed Post Office)
बेंगलोर मध्ये बनवण्यात आलेले नवीन पोस्ट ऑफिस लार्सन अँड ट्यूब्रो कन्स्ट्रक्शन यांनी बनवले आहे. यामध्ये थ्रीडी काँक्रीट प्रिंटिंग टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आला आहे. हे नवीन पोस्ट ऑफिस 1000 स्क्वेअर फूट क्षेत्रामध्ये बनवण्यात आलेले असून या नवीन पोस्ट ऑफिसच्या डिझाईनसाठी IIT मद्रास कडून मंजुरी देण्यात आली आहे. या निर्माण करण्यात येणाऱ्या या बिल्डिंगचं नाव केंब्रिज लेआउट पोस्ट ठेवण्यात आलेलं असून ही बिल्डिंग कमी वेळेत आणि कमी सामग्री मध्ये बनवण्यात आली आहे. ३-डी प्रिंटिंग तंत्रज्ञान डेनमार्कहून आयात करण्यात आली होती. या खास तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कंक्रीट फुटिंग आणि तीन स्तराची भिंत बांधण्यात आली आहे. यामध्ये रोबोटिकच्या मदतीने एम्बेडेड डिझाइन बनवण्यात आली आहे. हे पोस्ट ऑफिस फक्त ४३ दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. साधारणपणे यासाठी ६ ते ८ महिन्यांचा कालावधी लागतो. या तंत्रज्ञानामुळे एकूण २३ लाखांचा खर्च आला आहे. हा खर्च इतर तुलनेत खूपच कमी आहे.