टाइम्स मराठी । सध्या संपूर्ण राज्यात पावसाला सुरुवात झाली असून मनसोक्त चिंब होण्यासाठी कुठेतरी बाहेर निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाला जावं असं अनेकांना वाटत. बरेच जण विकेंडला आपल्या परिवारासोबत घरगुती ट्रिप काढतात. पण पावसाळ्यात रस्त्यावर सगळीकडे किचकिच असल्याने सर्वत्र मोठी दुर्गंधीही असते. पावसाळ्यात गाडीमध्येही अनेकदा घाण स्मेल येतो. तर कधी कार मध्ये साफसफाई क्लीनिंग व्यवस्थित नसते. त्याचबरोबर पावसामुळे विजीबिलिटी सुद्धा कमी होते. अशावेळी उपाय म्हणून काही ॲक्सेसरीज वापरणे आपल्याला आवश्यक आहे. चला आज आपण त्याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया…..
1) वॉटर रिपेलेंट
पावसाळ्यामध्ये विंडस्किन वर पाणी आल्यामुळे समोरच्या बाजूला स्पष्टपणे दिसत नाही. म्हणजेच विजीबिलिटी कमी होते. पण वॉटर रिपेलेंट चा वापर केल्यावर विंडशील्ड वर पाणी थांबत नाही. कारण ते विंडशील्डवर हायड्रोफोबिक ढाल बनून राहते आणि कितीही जोरदार पाऊस आला तरी विजीबिलिटी चांगली बनते.
2) अँटी फॉग फिल्म-
पावसाळ्यामध्ये विंडस्किन वर आणि साईड मिरर वर सुद्धा पाणी साचते. त्यामुळे मागील किंवा साईडचे दृश्य बघण्यासाठी त्रास होतो. हे पाणी हटवण्यासाठी एक फिल्म असते. ती ओआरवीएम वर लावल्या जाते त्यामुळे मागून येणारी गाडी स्पष्ट दिसते.
3) रेन वाईजर-
पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा आपण थोड्या प्रमाणात खिडकी उघडी करतो. पण यामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना पाणी कार मध्ये शिरतं. हे टाळण्यासाठी रेनवाईजर लावतात. रेनवाईजर मुळे जरी तुम्ही काच वर केली तरी पावसाचे पाणी गाडीमध्ये जाणार नाही.
4) एअर फ्रेशनर स्प्रे-
पावसाळ्यात बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो त्यापैकी एक म्हणजे कार कॅबिन मध्ये दुर्गंधी येणे. त्यामुळे आपण कार मध्ये बसू शकत नाही आणि ड्राईव्ह करतानाही त्रास होतो . त्यावर मात करण्यासाठी अशावेळी एअर फ्रेशनर वापरल्यास आपण या समस्येवर मात करू शकतो.
5) अँटिपॉक एजंट लिक्विड स्प्रे-
हा स्प्रे विंड स्किन आणि साईड मिरर क्लीन करण्यासाठी वापरला जातो. ज्यामुळे समोरील आणि मागील दृश्य आपल्याला पूर्णपणे दिसू शकेल आणि अपघात होण्याचे चान्सेस कमी होतील.