भक्तांसाठी लवकरच सुरु होतील ‘ही’ 5 मंदिरे, बांधकाम बघून तुम्हीही व्हाल अवाक

टाइम्स मराठी । भारत हा आपली सभ्यता, संस्कृती, धर्म, कला आणि योगासाठी जगप्रसिद्ध देश म्हणून ओळखला जातो. भारतात अनेक पुरातन मंदिरे आहेत ज्याठिकाणी भक्त मोठ्या उत्साहाने जातात आणि देवाला साकडं घालतात. त्यातच आता देशभरातील भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. याचे कारण म्हणजे येत्या काळात भारताला नवीन 5 भव्य मंदिर मिळणार आहेत. ही सर्व मंदिरे आकाराने तर मोठी असतीलच याशिवाय अनोख्या कॉन्स्ट्रक्शनने सुद्धा परिपूर्ण मंदिरे असतील. चला तर जाणून घेऊया या 5 मंदिरांबद्दल….

   
Shri Ram Mandir
Shri Ram Mandir

प्रभू श्री राम मंदिर– Ram Mandir

भगवान श्रीराम हे हिंदू धर्मातील दैवत आहे. त्यांना भगवान नारायण आणि भगवान विष्णू यांचा सातवा अवतार मानला जातो. ते आयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराज दशरथ आणि त्यांची ज्येष्ठराणी पुत्र होते. त्यांना श्रीराम आणि श्रीरामचंद्र या नावाने ओळखलं जातं. अयोध्या ही श्री राम यांची जन्मभूमी आहे. या जन्मभूमीवर पूर्वी भव्य मंदिर बांधण्यात आलेले होते. परंतु ते पाडण्यात आले होते. आता पुन्हा हे भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे. मागील तीन वर्षांपूर्वी 5 ऑगस्ट 2020 मध्ये या मंदिराची भूमिपूजन करण्यात आले होते आणि बांधकामाला देखील सुरुवात करण्यात आली. आता डिसेंबर 2023 मध्ये या राम मंदिराच्या एका भागाचे उद्घाटन केले जाणार असून ते भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे.

Vrindavan Chandrodaya Temple
Vrindavan Chandrodaya Temple

वृंदावन चंद्रोदय मंदिर– Vrindavan Chandrodaya Temple

वृंदावन चंद्रोदय मंदिर हे जगातील सर्वात लांब मंदिर असेल, जे सध्या वृंदावन, मथुरा येथे बांधले जात आहे. इस्कॉन चे संस्थापक असलेले श्रीला प्रभुपाद यांनी 1972 मध्ये श्री रूपा गोस्वामी यांच्या भजन कुटीरसमोर युक्लता वैराग्य बद्दल सांगितलं होतं. त्यावेळी ते म्हणाले की ज्याप्रमाणे आपण मोठमोठ्या इमारती बांधत असतो, त्याचप्रमाणे आपण भगवान श्रीकृष्णाचे खूप मोठे मंदिर बांधू शकतो. ज्यामुळे भौतिक क्रिया शुद्ध होऊ शकेल. आणि हे ऐकल्यानंतर इस्कॉन बेंगलोर येथील भक्तांनी या मंदिराचा प्रकल्प सुरू केला. या मंदिरासाठी दिल्ली येथील आयआयटी सिव्हिल इंजिनियर डिपार्टमेंट मधील इंजिनीअर ची टीम कामाला लागलेली आहे. या मंदिराची एकूण किंमत 300 कोटी रुपये असून सर्वात महागडे मंदिर आहे. पाच एकर मध्ये बांधण्यात आलेलं मंदिर हे सातशे फूट उंच आहे.

Om Shaped Shiva Temple
Om Shaped Shiva Temple

ओम आकाराचे शिव मंदिर– Om Shaped Shiva Temple

ब्रह्मा विष्णू महेश ज्यांना या विश्वाचा निर्माता म्हटलं जातं ते ओम. राजस्थान येथील पाली जिल्ह्यातील मारवाड तालुक्यातील जडण या गावांमध्ये ओम आकार असलेले शिव मंदिर बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. ओम आश्रम जाडन चे सचिव स्वामी फुलपुरी यांनी सांगितलं की, गेल्या पंचवीस वर्षापासून या ओम आकाराच्या भव्य शिव मंदिराचे बांधकाम सुरू आहे. सुमारे 250 एकर मध्ये पसरलेल्या आश्रमाच्या मध्यभागी हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. ओम आकृती असलेलं हे शिव मंदिर चार भागांमध्ये विभागलेलं असून एक पूर्ण ब्लॉग जमिनीखाली बांधला गेलेला आहे. त्यानंतर उरलेले तीन ब्लॉग जमिनीच्या वर आहेत. तळघरांमध्ये समाधी भोवती सहा तुळशीच्या मूर्ती या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे. या मंदिराचं काम 95 टक्के पूर्ण झालेला असून लवकरच हे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात येणार आहे.

Mahakal Lok
Mahakal Lok

महाकाल लोक– Mahakal Lok

भगवान शिव, देवी सती आणि इतर धार्मिक कथांशी संबंधित असणारे सुमारे 200 शिल्प आणि वित्त चित्र या मंदिरात असणार आहे. हे मंदिर रुद्र सागराच्या काठावर बनवण्यात येणार आहे. या महाकाल लोक मध्ये सात ऋषी, नवग्रह मंडळ, त्रिपुरासुर वध, कमळ तलावात बसलेले शिव,108 खांबामध्ये शिवाचे आनंद तांडव चिन्हांकित, शिवस्तंभ, आणि महाकाल कॉरिडॉर मध्ये देशातील सर्वात पहिले नाईट गार्डन हे देखील तयार करण्यात येणार आहे.

Biggest Ram Temple in Bihar

बिहार मधील सर्वात मोठे राम मंदिर– Ram Temple In Bihar

हे मंदिर बिहार मधील चंपारण मधील जानकी नगर मध्ये बांधण्यात येणार आहे. भगवान श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह झाल्यानंतर जनकपुर वरून परतत भगवान श्रीरामांची मिरवणूक या ठिकाणी थांबली होती. आता याच ठिकाणी भगवान श्री रामाचे जगातील सर्वांत मोठे मंदिर बांधलं जाणार आहे. हे मंदिर 270 फूट उंच तर 1080 फूट लांब आणि 540 फूट रुंद असणार असून पाटणाच्या महावीर मंदिर ट्रस्ट तर्फे बांधण्यात येत आहे. या बांधकामाचे काम नोएडाच्या एसबीएल कंट्रक्शन या कंपनीला देण्यात आले असून या मंदिरासाठी 500 कोटी रुपये खर्च येणार आहे.