60,000 mAh चा पॉवरबँक!! 10 वेळा करू शकता मोबाईल चार्ज

टाइम्स मराठी । मार्केटमध्ये मोबाईल विदाऊट चार्जर चार्ज करण्यासाठी पावरबॅंक हा ऑप्शन उपलब्ध आहे. पावरबॅंकच्या मदतीने मोबाईल चार्ज करणे सोपे होते. त्याचबरोबर आपण घराच्या बाहेर असाल तर मोबाईल चार्जिंग साठी  पावरबॅंकच उत्तम पर्याय आहे. मार्केटमध्ये आपण यापूर्वी 10,000mAh आणि 20,000 mAh पावरबॅंक उपलब्ध असून आता मार्केट मध्ये 60,000 mAh बॅटरी असलेले 2 पावरबँक लॉन्च करण्यात आले आहे. DURACELL कंपनीचे पावरबॅंक असून, तुम्ही या पावरबँक च्या मदतीने 10 वेळा मोबाईल फुल चार्जिंग करू शकतात. कंपनीने लॉन्च केलेले हे दोन्ही पावरबँक बॅटरी प्रमाणे डिझाईन करण्यात आले आहे. जाणून घेऊया या पावरबॅंकचे फिचर्स.

   

DURACELL M150

DURACELL M150 ही पावरफुल असून या पावरबँक मध्ये 25,000 MAH बॅटरी उपलब्ध आहे. हा पावरबँक 6 वेळेस स्मार्टफोन किंवा एकदा लॅपटॉप पूर्णपणे चार्ज करू शकतो एवढी बॅटरी यामध्ये उपलब्ध आहे. हा पावरबॅंक चार्ज करण्यासाठी 100W आणि 60W  क्षमता असलेले चार्जर देण्यात आले आहे. या पावरबँक सोबत 2 USB C PORT,  2 USB A PORT देण्यात आले आहे. या पावरबँक च्या मदतीने तुम्ही इलेक्ट्रॉनिक सर्व उपकरणे चार्ज करू शकता. या पावरबॅंकची किंमत 16,567 रुपये आहे.

DURACELL M250

DURACELL M250 या पावरबँकची डिझाईन देखील  M150 प्रमाणे आहे. यामध्ये 1 रिंगलाईट देण्यात आली आहे. या पावरबॅंकमध्ये 60,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा पावरबँक 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या पावरबँक मध्ये चार्जर ठेवण्यासाठी स्टोरेज देखील उपलब्ध आहे. या पावरबँक च्या किमती बद्दल बोलायचं झालं तर, DURACELL M250 पावरबँकची किंमत 24,891 रुपये आहे.