75 रुपयांचे नाणे पाहिले का? 50% चांदी असलेले हे नाणे कुठे मिळेल जाणून घ्या

मराठी टाइम्स टीम । नुकतंच नवीन संसद भावनाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक खास स्मारक तिकीट आणि विशेष स्मारक नाणे जाहीर केले. हे नाणे तुम्ही पहिले का ? हे नाणं पाहिल्यावर तुम्हाला देखील याचा हेवा वाटेल. या नाण्याची किंमत किती असेल?दिसायला कसे असेल ? किती चांदी वापरलेली असेल? असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील. त्याचबरोबर हे नाणे घेण्यासाठी तुमची पण इच्छा होत असेल. परंतु या सर्व प्रश्नांपुर्वी जाणून घेऊया कि हे नाणं आपण वस्तू खरेदी करण्यासाठी वापरू शकतो कि नाही.

   

या नाण्याची खासियत म्हणजे याचे वजन 35 ग्राम आहे . याच्या मध्य भागावर अशोक स्थंभ आहे, आणि मध्यभागी सत्यमेव जयते लिहिलेले आहे . एवढेच नाही तर भारत आणि इंग्रजी मध्ये इंडिया असं देखील लिहिले आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूने नवीन उदघाटन झालेल्या संसदेचे चित्र छापून त्याखाली संसद परिसर असं लिहिण्यात आलेले आहे .

या नाण्याला बनवण्यासाठी तिन्ही धातूंचा वापर करण्यात आलेला आहे. यात चांदीचा फक्त 50 टक्के वापर करण्यात आलेला असून हे नाणे वजनाणे जड आहे. हे ऐकून आश्चर्य वाटेल कि हे नाणे त्याच्या किमती पेक्षा जास्त मौल्यवान आहे. हे नाणे बनवण्यासाठी 75 रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. या 75 रुपयाच्या नाण्याची साईज हि 44 मिमी आहे. 35 ग्रॅम च्या या नाण्या साठी 17.5 ग्रॅम चांदी तर 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के जस्त वापरलेले आहे.

हे नाणं खरेदी करायचे असेल तर भारत सरकारच्या या वेबसाईट वर उपलब्ध आहे पण ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला अगोदर ऑर्डर द्यावी लागेल. भारत सरकारच्या www.indiagovtmint.in या वेसाइटवरून तुम्हाला खरेदी करता येईल पण अजुन सरकारनं या नाण्याची किंमत ठरवलेली नाही. लवकरच याची घोषणा करण्यात येईल. त्याचबरोबर बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नाण्याचे बाजार किंमत सुमारे 1,300 रुपये असू शकते.