7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार तब्बल 50 हजारांची वाढ, मोदी सरकारचा निर्णय

टाइम्स मराठी टीम (7th Pay Commission) : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे. लवकरच केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबर देणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे बोलले जात आहे. अनेक दिवसांपासून वेतनवाढीची कर्मचारी मागणी करत आहेत. आता २०२४ च्या निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदी याबाबतचा निर्णय घेऊ शकतात असे सांगितले जात आहे.

   

कर्मचाऱ्यांच्या वेतनात फिटमेंट फॅक्टर वाढणार असुन त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांचे वेतन वाढण्यावर होणार आहे. फिटमेंट फॅक्टर विशिष्ट कालावधीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल अडीच पटीने वाढतो. आता पर्यंत हा फिटमेंट फॅक्टर 2.57 एवढा होता. आता हा वाढून 3.68 इतका जाऊ शकतो. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे.

7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) शिफारशीनुसार, कर्मचाऱ्यांचे वेतन हे भत्या शिवाय त्यांचे मूळ वेतन आणि फिटमेंट फॅक्टर यानुसार ठरवले जाते. हा आयोग लागू झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर दरांमध्ये सुधारणा करणे शक्य आहे. पूर्वी कर्मचार्‍यांचे किमान वेतन 6000 रुपये होते, पण 2016 मध्ये, फिटमेंट फॅक्टर मध्ये सुधारणा करून हे किमान वेतन 18000 रुपये करण्यात आले. आणि त्याच वर्षी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. सध्या फिटमेंट फॅक्टर हा 2.57 एवढा आहे. आता तो वाढवून 3.69 टक्के करण्याची मागणी केली जात आहे. जर सरकारने याबाबत निर्णय घेतला तर कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 21 हजार वरून 26 हजार रुपये करण्यात येईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2024 मध्ये निवडणुका होणार असल्यानं 2026 पासुन हा फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा निर्णय मोदी सरकार लागू करु शकते. त्यामुळे पगारात अडीच पट वाढ होऊ शकते. सरकार कडून या निर्णयाबाबत अजून काही वक्तव्य आलेले नाही. 7 व्या वेतन आयोगामार्फत फिटमेंट फॅक्टर 2.57 एवढा वाढवण्यात येणार आहे. म्हणजे महागाई भत्ता, प्रवास भत्ता, घर भत्ते हे देखील वाढतील. भाडे भत्ता, मूळ पगार फिटमेंट घटकाने गुणाकार केला तर एकूण पगार काढता येईल.

किती रुपयांनी पगार वाढणार?

समजा, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर भत्ते न मोजता त्याचा पगार 18,000 X 2.57 = रुपये 46 हजार 260 एवढा वाढेल. तसेच फिटमेंट फॅक्टर 3.68 एवढा वाढला तर 26000 × 3.68 = 95 हजार 680 एवढा वाढेल. म्हणजे नफा 49 हजार 420 एवढा होईल.