टाइम्स मराठी । सध्या पावसाळा सुरू आहे आणि त्यामुळे बऱ्याच नदी नाल्यांना पूर आला आहे. बऱ्याच शहरांमध्ये घराच्या बाहेर निघणे सुद्धा मुश्किल झाले असून बऱ्याच गाड्या, घरे या पुरामध्ये वाहून जाताना दिसत आहेत. त्यामुळे शक्य असेल तरच घराच्या बाहेर निघा. गरज नसल्यास घराच्या बाहेर पडणं टाळा असं आवाहन सरकार आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु इशारा देण्यात आल्यानंतरही बरेच जण घराच्या बाहेर बिनकामी पडतात. त्यामुळे स्वतःचा आणि दुसऱ्यांचा जीव देखील लोक धोक्यात घालत असतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये नदीला प्रचंड मोठा पूर आला असून पुलावर पाणी साचलेले दिसत आहे. त्याचवेळी पुलावरून एक प्रवाशांनी भरलेली बस रस्ता काढत जाताना दिसत आहे. ही बस जसजशी पाण्यातून रस्ता काढत जाते. तसेच एका पॉईंटला पानाच्या प्रवाहाच्या आत निघून जाते. या ठिकाणी सुरू असलेला हा पाण्याचा प्रवाह एवढ्या जोरदार आहे की बस ड्रायव्हर ने कितीही प्रयत्न करूनही बस सरळ मार्गाने जाऊ शकत नाही. ही बस पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जात शेवटी बुडताना दिसत आहे. यावेळी घाबरलेल्या प्रवाशांचा आरडाओरडा सुद्धा ऐकू येत आहे.
हि घटना भारतातील वाटत नाही. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून गाडीच्या ड्रायव्हर वर टीका करत लोकांनी संताप व्यक्त केला. पाण्यासोबत मस्ती करणं किती महागात पडू शकत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलं आहे. आत्तापर्यंत व्हिडिओला 2.3 k लोकांनी लाईक केलं असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.