जगातील पहिले महान राजकारणी, तत्त्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून आचार्य चाणक्य यांना पाहिले जाते. चाणक्य यांचे तत्व रोजच्या जीवनात अपील केल्यानंतर त्या व्यक्तीच्या आयुष्याची घडी कधीच विस्कटत नाही असे म्हटले जाते. समाजासाठी आयुष्यासाठी चाणक्य यांनी बऱ्याच गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आचार्य चाणक्य यांचे असे चार धोरणे सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अपयश कधीच देणार नाही.
आचार्य चाणक्य आपल्या पहिल्या धोरणात सांगतात की, मनुष्याने धनप्राप्तीसाठी काम करणारा कोणत्याच गोष्टीची लाज बाळगू नये. जर आपण एखाद्या कामाची लाज वाटून घेतली तर ते काम आपल्याकडून कधीच पूर्ण होणार नाही तसेच त्या कामासंबंधीत मिळणारा मोबदला आपल्याला आपल्या इच्छेनुसार मिळणार नाही. असे केल्यास त्याच व्यक्तीला नुकसान सहन करावे लागेल. त्यामुळे नेहमी कोणतेही काम स्वच्छ मनाने आणि आनंदाने करावे.
आचार्य चाणक्य सांगतात की, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर ते पैसे परत घेताना तुम्ही कोणतेही लाज बाळगायला नको. आपल्याला आपलेच पैसे मागताना लाज वाटायला नाही पाहिजे. तुम्ही जर असे केले तर याचा तोटा तुम्हालाच होऊ शकतो आणि तसेच तुमचे पैसे देखील बुडू शकतात. एखाद्या व्यक्तीला पैसे दिल्यानंतर ते पैसे देताना देखील तुम्ही स्वच्छ मनाने दिले पाहिजे. तुमच्या मनात पैसे देताना कोणतीही वाईट भावना नसली पाहिजे.
आपल्या तिसऱ्या धोरणात आचार्य चाणक्य सांगतात की, मनुष्य पैसे फक्त पोटासाठी कमवत असतो. तो जे काम करतो त्यातून त्याला दोन वेळचे जेवायला व्यवस्थित मिळावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने अन्न खाताना कधीही लाजू नये. तसेच आपल्याला त्याची लाज वाटता कामा नये. अनेक वेळा लोक नवीन ठिकाणी गेल्यानंतर लाजाळूपणामुळे आपली भूक मारतात परंतु असे करणे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे आपल्यावरच उपाशी राहण्याची वेळ येते.
आचार्य चाणक्य यांचे चौथे धोरण आपल्याला हे सांगते की, गुरूंकडून शिक्षण घेताना आपल्याला कोणतीही लाज वाटायला नाही पाहिजे. गुरु हे आपल्या आयुष्याचे मार्गदर्शक असतात ते आपल्याला योग्य वळण लावतात तसेच चूक बरोबर असे सर्व काही शिकवतात. त्यामुळे आपल्याला कोणतीही नवीन गोष्ट शिकताना परिस्थितीची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची लाज वाटता कामा नये. शिक्षणासाठी मनुष्याने सर्व लाज बाजूला ठेवायला हवी.