Ola च्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरवर 1.1 लाख रुपयांची प्राईम ऑफर सुरु; कंपनीने वाढवली 15ऑगस्टपर्यंत मुदत

टाइम्स मराठी | देशात नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या Ola Electric S1 एअर मॉडेलला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. ग्राहकाकडून या नवीन मॉडेलला चांगलीच पसंती देखील मिळत आहे. त्यामुळेच कंपनीने या नवीन मॉडेलवर एक खास ऑफर आणली आहे. कंपनीने सर्व रिझर्व्हर्ससाठी 1.1 लाख रुपयांची ऑफर येत्या 15 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून दिली आहे.

   

भाविश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, Ola S1 एअर मॉडेलला ग्राहकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. तसेच या मॉडेल साठी होणारी मागणी आमच्या अपेक्षेपेक्षाही बाहेर आहे. त्यामुळे या सर्व ग्राहकांसाठी कंपनीने 1.1 लाख रुपयांची ऑफर पुन्हा सुरू केली आहे. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत ही वापर कंपनीकडून देण्यात येईल. या काळात ग्राहक ओला एस1 एअर मॉडेल खरेदी करू शकतात.

Ola Electric S1 Offer

भाविश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जुलै म्हणजेच रविवारी आठ वाजल्यापासून 1.1 लाख रुपयांची ऑफर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ही ऑफर फक्त 15 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहील. या ऑफरची तारीख वाढवण्याचा निर्णय कंपनीने फक्त ग्राहकांची पसंती घेतला आहे. ओलाच्या नवीन मॉडेलमध्ये देण्यात आलेल्या फीचर्समुळे ग्राहक ही स्कूटर जास्त प्रमाणात खरेदी करत आहेत.

Ola Electric S1 features

Ola Electric S1 मध्ये कंपनीने अनेक फीचर्स आणि सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे जुन्या मॉडेल पेक्षा हे नवीन मॉडेल जास्त फायदेशीर ठरत आहे. या Ola S1 Air मॉडेल मध्ये कंपनीने 3 किलोवॅट बॅटरी पॅकची सुविधा दिली आहे. या स्कूटर ची बॅटरी चार्ज व्हायला चार तास 50 मिनिटे लागतात. एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 125 किलोमीटर पर्यंत रेंज देईल. तसेच ही स्कूटर 4.3 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास सहज कापू शकते. खास म्हणजे, Ola S1 Air चा टॉप स्पीड ताशी 90 किलोमीटर आहे.

दरम्यान यापूर्वी कंपनीने Ola Electric S1 खरेदी करण्याची विंडो 28 जुलै ते 31 जुलै च्या कालावधीपर्यंत उघडली होती. या कालावधीत जो कोणी Ola Electric S1 रिझर्व्ह करेल त्याला हे मॉडेल 109999 रुपयांच्या प्रास्ताविक किमतीत मिळत होते. तर ऑफर संपल्यानंतर शोरूम किमतीनुसार हे मॉडेल 1,19,999 रुपयांमध्ये ग्राहकांना उपलब्ध होत होते. मात्र आता कंपनीने बुकिंग विंडो 15 ऑगस्टपर्यंत उघडली आहे.