Ather 450S Vs Ola S1 Air : कोणती गाडी बेस्ट? पहा Full Comparison

टाइम्स मराठी । इलेक्ट्रिक वाहनांकडे आजकाल ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. वाढती महागाई आणि पेट्रोलचे दर पाहता इलेक्ट्रिक वाहन परवडणारे असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. टू व्हीलर बाजारामध्ये झालेला हा बदल पाहता टू व्हीलर निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक वाहन बनवण्यामध्ये आपलं लक आजमावत आहे. त्याचबरोबर एकापेक्षा एक वरचढ अशा इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. भारतीय बाजारामध्ये Ather आणि Ola या 2 कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कुटरला ग्राहकांची मोठी पसंती आहे. तुम्ही सुद्धा Ather घेऊ कि Ola घेऊ यामध्ये गोंधळात असाल तर आज आम्ही तुम्हाला Ather 450S आणि Ola S1 Air या इलेक्ट्रिक स्कूटर पैकी कोणती बेस्ट ठरेल हे तुम्हाला सांगणार आहोत.

   

Ather 450S

Ather 450S या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आलेले असून ही स्कूटर Ola सोबत प्रतिस्पर्धा करते. या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये 3300W ची मोटर देण्यात आलेली आहे.सुपरफास्ट चार्जिंग केल्यानंतर Ather 450S पाच तासात चार्ज होते आणि एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ही स्कुटर 115 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. यासोबतच 111.6kg वजन असलेली ही इलेक्ट्रिक स्कूटर वेगवेगळ्या फीचर्स ने परिपूर्ण आहे. यामध्ये एलटीइ कनेक्टिव्हिटी, कॉल अँड एसएमएस अलर्ट, म्यूओर कंट्रोल, मल्टिपल थीम आणि नाईट मोड, ऑटो ऑफ टन इंडिकेटर, गाईड मी होम लाईट, डॉक्युमेंट स्टोरेज, ओटीएस सॉफ्टवेअर अपडेट, आणि हिल होल्ड कंट्रोल हे फीचर्स यामध्ये देण्यात आलेले आहे. Ather 450S या इलेक्ट्रिक स्कूटर ची एक्स शोरुम किंमत 1,29,999 रुपये एवढी आहे.

OLA S1 Air

गेल्या महिन्याभरापासून भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रिक गाड्या विकल्या जाणारी निर्माता कंपनी म्हणून OLA प्रसिद्धीस उतरली आहे. OLA S1 Air या इलेक्ट्रिक स्कूटर चे वजन 99 kg एवढे असून LED हेडलॅम्प आणि टेललॅम्प, फ्लॅट फ्लोअरबोर्ड देण्यात आले आहे. त्याचबरोबर सिंगल पीस ट्यूबलर ग्रॅब हँडल, TFT डिस्प्ले 7 इंच, यासह हिल होल्ड आणि प्रॉक्सीमिटी अलर्ट यासारखे फीचर्स या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देण्यात आले आहे. OLA S1 Air या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये देण्यात आलेल्या बॅटरी बद्दल बोलायचं झालं यात 3kwh बॅटरी उपलब्ध आहे. यासोबत हब माउंटेन इलेक्ट्रिक मोटर्स देण्यात आली असून ती 4.5kw पॉवर जनरेट करते. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 101 km पर्यंतची रेंज देते. त्याचबरोबर टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रतितास एवढा असून ही 3 रायडींग मोड मध्ये उपलब्ध आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर इको, नॉर्मल, स्पोर्ट्स या तीन रायडिंग मोड मध्ये तुम्ही स्कूटर चालवू शकतात. ओला S1 एयर मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फॉर्क, ट्विन रियर शॉक अब्जॉर्बर यासह फ्रंट और रियर ड्रम ब्रेक्स देखील देण्यात आले आहे. OLA S1 Air ची किंमत १.१० लाख रुपये आहे.