टाइम्स मराठी । आज कालच्या जगात सायन्स आणि टेक्नॉलॉजी एवढ्या पुढे गेलेली आहे की आपण फक्त विचार केलेली एखादी गोष्ट आपला समोर तयार होऊन उभी असते. ऑटोमोबाईल क्षेत्राचा विचार केला तर, पूर्वी सायकल वर लोक प्रवास करत होते. त्यानंतर पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध झाल्या. आता काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहन रस्त्यावर धावताना दिसत आहे. आता काही वर्षा नंतर फ्लाईंग कार देखील लवकरच लॉन्च होणार आहेत. आणि यातच आता अजून एक कार बेंगलोर मध्ये चर्चेत आहे. ही कार ड्रायव्हरलेस कार असून हॉलीवुड सायन्स फाई या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे दिसते. सोशल मीडियावर या कारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. म्हणजेच आता इलेक्ट्रिक कार नंतर आपल्याला ड्रायव्हरशिवाय चालणारी कार देखील उपलब्ध होणार आहे.
बेंगलोर मध्ये रस्त्यावर ड्रायव्हर लेस कार चालतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही ड्रायव्हर शिवाय चालणारी कार पाहून रस्त्यावरील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसल्याचं दिसून येत असून या ड्रायव्हर लेस कार मध्ये वाहन कंट्रोल करण्यासाठी कोणताच मनुष्य बसलेला नाही. हा व्हिडिओ अनिरुद्ध रविशंकर नावाच्या युजरने ट्विटरवर पोस्ट केलेला आहे. आणि या पोस्टच्या खाली ‘बंगलोर च्या रस्त्यांवर’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
कोणी तयार केली ड्रॉयव्हर शिवाय चालणारी कार –
ही कार बेंगलोर मध्ये स्टार्टअप मायनस झिरो या कंपनीने तयार केलेली असून ही कार ZPod आहे. ZPod म्हणजे हे कॅमेरा सेंसर सूटवर आधारित इलेक्ट्रिक प्रोटोटाईप वाहन आहे. त्याचबरोबर ही अनोखी कारआर्टिफिशियल इंटेलिजंटच्या अल्गोरिदम सह मिळून चालते. या कारमध्ये सेल्फ ड्राइविंग टेक्निक वापरण्यात आलेली असून विना मनुष्य ही कार सहजपणे रस्त्यावर, ट्राफिक मधून जाऊ शकते. यासोबतच मायनस झिरो वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ZPod बाय डायरेक्शनल असून या कार साठी स्टिअरिंग व्हील ची गरज नाही.
मायनस झिरोने ही ऑटोनॉमस कार याच वर्षी जून महिन्यामध्ये लॉन्च केली होती. ही कंपनी ऑटोनिर्माता नसून एक टेक फर्म आहे. या कंपनीला टेस्टला आणि गुगल प्रमाणे पूर्णपणे ऑटोनॉमस वाहन तयार करायचे असून ऑटोनॉमस ड्रायव्हिंग टेकनिक देखील त्यांना विकसित करायची आहे. त्याचबरोबर ते वाहन इतर उत्पादकांना देऊन त्यांचे ADAS सुईट परफेक्ट बनवू शकतात. त्याचबरोबर ZPod च्या मदतीने ट्राफिक आणि रोड एक्सीडेंट देखील कमी होण्याची शक्यता असून ट्रान्सपोर्ट साठी हे माध्यम उत्तम असू शकतं असं देखील त्यांनी सांगितलं.
मायनस झिरोचे सीओओ म्हणाले की, ट्राफिक मुळे प्रत्येक दिवशी गाडीचे 215 लाख लिटर फ्युल प्रति तास वाया जाते. त्याचबरोबर बाकीचे होणारे नुकसान पाहिलं तर एका वर्षामध्ये देशाचे 22 बिलियन डॉलर एवढं नुकसान झाले आहे. ZPod हे लाईट इटेक्शन अँड रेसिंग चा वापर करत नाही तर हे 6 कॅमेऱ्याचा वापर करते. त्यामुळे बाकीच्या ऑटोनॉमस वाहनांपेक्षा ZPod हे वेगळं आहे. यामध्ये 4 कॅमेरे साईडला तर 2 कॅमेरे पुढच्या आणि मागच्या साईडने वापरण्यात आले आहे.