टाइम्स मराठी । ॲमेझॉनवर ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल 2023 सेलला (Amazon Great Freedom Festival Sale 2023) सुरूवात झाली आहे. ग्रेट फ्रीडम सेल फक्त 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान सुरू आहे. त्यामुळे या सेलचे आज आणि उद्या असे दोनच दिवस उरले आहेत. ॲमेझॉनवर सुरू असलेल्या ग्रेट फ्रीडम सेल देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आधी साजरा केला जात आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर धमाकेदार ऑफर देण्यात येत आहे. सेलमध्ये काही कंपन्यांचे स्मार्टफोन शुल्लक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आज आपण याच स्मार्टफोनविषयी आणि त्यांच्या ऑफरविषयी जाणून घेणार आहोत.
![Amazon Great Freedom Festival Sale 2023 :10 हजारच्या आत 'हे' Mobile उपलब्ध 2 Realme Narzo N53 1](https://timesmarathi.news/wp-content/uploads/2023/08/Realme-Narzo-N53-1.webp)
1) Realme Narzo N53
भारतात नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये Realme Narzo N53 या फोनचा समावेश आहे. हा स्मार्टफोन फक्त १०,९९९ रूपयांना लॉन्च करण्यात आला आहे. आता हाच स्मार्टफोन ॲमेझॉनच्या सेलमध्ये ८,९९९९ रुपयांना उपलब्ध होत आहे. Realme Narzo N53 मध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले कंपनीनं दिला आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz इतका आहे. तर स्मार्टफोनमध्ये ब्राईटनेस ४५० नीट्स इतका आहे. Octa Core Unisoc T612 SoC वर काम करणारा रिअलमी नाझरो N53 ६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट देतो आहे.
![Amazon Great Freedom Festival Sale 2023 :10 हजारच्या आत 'हे' Mobile उपलब्ध 3 Redmi 12C](https://timesmarathi.news/wp-content/uploads/2023/08/Redmi-12C.jpg)
2) Redmi 12C – (Amazon Great Freedom Festival Sale 2023)
स्मार्टफोन बाजारात Redmi 12C ची किंमत १३,९९९ रुपये आहे. मात्र ॲमेझॉनच्या सेलमध्ये हाच फोन ८,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.७१ इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. ज्यामध्ये ६० Hz चा रिफ्रेश रेट मिळणार आहे. त्याचबरोबर, या स्मार्टफोनमध्ये पिक्सल रिझोल्युशन हे १६००×७२० इतके आहे. तसेच, ५००० mAh ची बॅटरी 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS असे इतर फिचर देखील ऊपलब्ध आहेत. Redmi 12C मध्ये ६.६७ इंचाचा FFHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
![Amazon Great Freedom Festival Sale 2023 :10 हजारच्या आत 'हे' Mobile उपलब्ध 4 Redmi A2](https://timesmarathi.news/wp-content/uploads/2023/08/Redmi-A2-1024x768.jpg)
3) Redmi A2
ॲमेझॉनच्या (Amazon Great Freedom Festival Sale 2023) सेलमध्ये Redmi A2 स्मार्टफोन फक्त ३,३३० रुपयांना उपलब्ध होत आहे. या फोनची मूळ किंमत ८,९९९ इतकी आहे. मात्र ॲमेझॉनच्या सेलमध्ये हा स्मार्टफोन ३,३३० रुपयांना मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टँडबायसह 4G, VoLTE, Wi-Fi उपलब्ध आहे. चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट ही देण्यात आले आहे. अशा अनेक कारणांसाठी रेडमी ए टू सध्या ग्राहकांच्या पसंदीत पडत आहे. कमी दरात फोन घेऊ इच्छिणारे ग्राहक नक्कीच Redmi A2 स्मार्टफोनचा विचार करू शकतात.
![Amazon Great Freedom Festival Sale 2023 :10 हजारच्या आत 'हे' Mobile उपलब्ध 5 Samsung Galaxy M13](https://timesmarathi.news/wp-content/uploads/2023/08/Samsung-Galaxy-M13-1024x512.jpg)
4) Samsung Galaxy M13
ॲमेझॉनवर ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हलमध्ये Samsung Galaxy M13 स्मार्टफोन ९,६९९ रुपयांना खरेदी करता येत आहे. या स्मार्टफोनची मुळे किंमत १४,४९९ रुपये आहे. या स्मार्टफोनला २४०८×१०८० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.६ इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले उपलब्ध आहे. तसेच, डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या स्मार्टफोनमध्ये octa-core Exynos 850 चिपसेट आहे. यासोबतच ४ GB आणि ६ GB रॅमसह ६४ GB आणि १२८ GB स्टोरेज असे पर्याय ही देण्यात आले आहेत. ॲमेझॉनवर सुरू असलेल्या सेलमध्ये हे सर्व स्मार्टफोन कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. उद्या म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी हा सेल समाप्त होणार आहे.