टाइम्स मराठी | आपण बऱ्याच हॉलीवुड चित्रपटात ऑटोबोट्स हिरोचे पात्र साकारताना बघत असतो हे पात्र वेगवेगळ्या गाड्यांमध्ये स्वतःला बदलत असतात. असंच काहीसं तुर्की येथील एक कंपनी लेट्रोन्स ने सत्यात उतरवलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला आहे की, एक BMW कारला ट्रांसफार्मर मध्ये बदलतानाचं हे दृश्य आहे. या गाड्या रोबोट पासून रेगुलर गाड्यांमध्ये बदलण्याची क्षमता ठेवतात. दोन्ही बाजूंनी यांचं काम शानदार आहे. त्याचबरोबर ही कार ड्राईव्ह देखील केली जाऊ शकते. म्हणजेच हे फक्त शोपीस साठी तयार केलेले मॉडेल नसून ही कार चालवण्यासाठी देखील उपयोगी आहे.
या ट्रान्सफार्मर कारला एका इंजिनियर्सच्या टीमने तयार केलेले असून या कारला एंटीमोन नाव दिले आहे. 12 फिट लांब असलेला हे ट्रान्सफर्म रोबोट बीएमडब्ल्यू थ्री सिरीज ची एक कार चे रुप आहे. या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कारचे दोन्ही दरवाजे म्हणजे या रोबोटचे हात असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर रोबोटचे पाय कारच्या सर्वात मागच्या हिस्साला सेट केल्याचा दिसून येत आहे.
एवढेच नाही तर या ट्रान्सफॉर्मर ला पाय आणि रियर व्हील वर उभे राहताना देखील दिसत आहे. या रोबोटचा डोकं गाडीच्या बोनट मधून बाहेर निघताना दिसत आहे. ही एक ग्राउंड ब्रेकिंग फ्युजन टेक्नॉलॉजी आणि इंजेनुइटी आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये दिलं आहे की, हे फक्त शोपीस मॉडेल नसून ही कार चालवली देखील जाऊ शकते.