गाडीवर तिरंगा लावून देशभक्ती दाखवणे महागात पडणार; होऊ शकते जेल

टाइम्स मराठी । देशाचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशातच बरेच जण देशभक्ती दाखवण्यासाठी वाहनावर झेंडे लावण्यास सुरुवात करतात. पण बऱ्याचदा स्वातंत्र्य दिन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे झेंडे कचऱ्यात दिसतात तर बराचदा रस्त्याच्या कडेला पडलेले दिसतात. यामुळे तिरंग्याचा अपमान होतो. यामुळेच आता सरकारने नवीन नियम लागू केला आहे. आता गाडीवर तिरंगा लावून देशभक्ती दाखवणे चांगलंच महागात पडणार आहे. यामुळे तुरुंगात देखील जावे लागू शकते.

   

राष्ट्रध्वज फडकावण्या संदर्भात 21 वर्षांपूर्वी म्हणजे 2002 मध्ये राष्ट्रीय ध्वज संहिता तयार करण्यात आली होती. या संहितेनुसार काही खास लोकांनाच वाहनावर तिरंगा लावण्याचा अधिकार आहे. याशिवाय कोणीही वाहनांवर तिरंगा लावू शकत नाही. जर असे आढळले तर तुम्हाला खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते. एवढेच नाही तर याबाबत गुन्हा दाखल झाल्यास तुम्हाला शिक्षा देखील भोगावी लागू शकते.

कोण लावू शकत गाडीवर झेंडा –

राष्ट्रीय ध्वज संहितानुसार, देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री,लोकसभेचे आणि राज्यसभेचे सभापती – उपसभापती, राज्यपाल, उपराज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती, सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनाच वाहनांवर ध्वज लावण्याचा अधिकार आहे. या व्यक्तींशिवाय इतर कोणीच त्यांच्या गाड्यांवर तिरंगा लावू शकत नाही. असे आढळल्यास पोलिसांकडून चलन कापण्यात येऊ शकते आणि गुन्हा दाखल होऊन तुरुंगातही जावे लागू शकते.