टाइम्स मराठी । महिंद्रा अँड महिंद्राच्या काही आलिशान कार वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत आहे. महिंद्रा कंपनी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी महिंद्रा कंपनी त्यांच्या बेस्ट मॉडेल असलेल्या कार्स वर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देत आहे. यामध्ये थार 4×4, बोलेरो, बोलेरो नियो, मराजो आणि एक्सयुवी 300 या कार वर डिस्काउंट देण्यात येत आहे. त्याचबरोबर ग्राहकांना काही ॲक्सेसरीज वर सुद्धा सूट मिळू शकते. चला तर जाणून घेऊयात या महिन्यात या कार्डवर किती टक्के डिस्काउंट देण्यात येत आहे आणि त्यांची किंमत किती आहे याबाबत.
महिंद्रा मराजो (Mahindra Marazzo)
महिंद्रा कंपनीची महिंद्रा मराजो ही कार 1.5 लिटर डिझेल इंजिन 1497 cc सह उपलब्ध असून 123 hp पॉवर आणि 300NM टॉर्क जनरेट करते. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आलेले असून महिंद्रा मराजो च्या वेगवेगळ्या वेरिएंट वर कंपनी डिस्काउंट देत आहे. यामध्ये बेस मॉडेल M2 वर 58000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत असून मिड स्पेक M4 वर 36 हजार रुपये आणि टॉप स्पेक M6 या वेरियंट वर 73000 रुपयांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे.
महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero)-
महिंद्रा बोलेरो मध्ये एक पॉईंट पाच लिटर डिझेल इंजिन देण्यात आलेले आहे. यासोबतच ही कार 75hp पॉवर जनरेट करते. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत उपलब्ध असून या कार सोबत फाईव्ह स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आलेले आहे. महिंद्रा बोलेरो कार वर 60 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात आलेलं असून या कारच्या वेगवेगळ्या ट्रेन वर वेगवेगळी डिस्काउंट मिळत आहे. या गाडीच्या B4 ट्रिम वर 37000 रुपये, B6 ट्रेन वर 25 हजार रुपये, B6 ऑप्शनल ट्रिम वर 60 हजार रुपये सूट देण्यात आलेली आहे.
महिंद्रा बोलेरो नियो (Mahindra Bolero Neo)
महिंद्रा कंपनीच्या महिंद्रा बोलेरो नियो या कारमध्ये 1.5-लीटर डीजल इंजन देण्यात आले आहे. हे इंजिन 5-स्पीड मैनुअल ट्रांसमिशन सह 100hp पॉवर जेनरेट करते. या कारच्या व्हेरिएन्टनुसार, तिच्या किमती वेगवेगळ्या आहेत. महिंद्रा बोलेरो नियो वर या महिण्यात 50,000 रुपये सह N4 वेरिएंट वर 22,000 रुपये, N8 वेरिएंट वर 31,000 रुपये, N10 R आणि N10 ऑप्शनल वर 50,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे.
महिंद्रा XUV300 (Mahindra XUV300)
महिंद्रा कंपनीच्या महिंद्रा XUV300 ही कार डिझेल वेरियंट मध्ये उपलब्ध असून त्यावर 20 ते 55000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळत आहे. यासोबतच XUV आणि XUV 300 वर 55 हजार रुपये, TGDI व्हेरियंट वर वीस हजार रुपये त्याचबरोबर बाकीच्या वेरियंटवर 5000 ते 55000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे.
महिंद्रा थार (Mahindra Thar)
महिंद्रा कंपनीची महिंद्रा थार 4×4 की आजच्या पिढीला भाळणारी कार 30000 कॅश डिस्काउंट वर उपलब्ध आहे. त्याचबरोबर या कारमध्ये दोन प्रकार उपलब्ध असून AX (O) आणि LX हे दोन प्रकार दोन्ही सॉफ्ट आणि हार्ड टॉप बॉडी मध्ये येतात. महिंद्रा कंपनीने थार 4×4 मध्ये दोन वेगवेगळे इंजिन पर्याय उपलब्ध करून दिले आहे. यात 2.0-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून 150PS पॉवर आणि 320Nm टॉर्क जनरेट करते. त्याचबरोबर डिझेल वेरिएंटमध्ये 2.2-लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे 130PS ची पॉवर आणि 300Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेसशी जुळतात.