आता TV वर दिसणार 900 चॅनेल्स; GSAT -24 सॅटेलाइट लॉन्च

टाइम्स मराठी । भारतामध्ये मागच्या वर्षी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यांनी GSAT -24 हे सॅटेलाईट लॉन्च केले होते. या माध्यमातून आता टाटा प्ले ने सोमवार पासून GSAT -24 चा वापर करणे सुरू केले आहे. हे सॅटॅलाइट डायरेक्ट टू होम डीटीएच सेवा प्रदान करणाऱ्या टाटा प्लेला भाड्याने देण्यात आला आहे. यामुळे आता टीव्ही पाहण्याची वेळ आणि पद्धत बदलू शकते. GSAT -24 च्या माध्यमातून आता 900 चैनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. GSAT -24 हे सॅटेलाईट वापरण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. आणि DTH सेवा प्रदान करणाऱ्या टाटा प्ले ने भाड्याने घेतल्यामुळे टाटा प्ले ला याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्याच्या प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारे सर्व चॅनल्स या सॅटेलाईट वरून आता प्रसारित केले जातील. यापूर्वी वेगवेगळ्या सॅटेलाईट वरून चॅनेल प्रसारित केले जात होते. बऱ्याच भागामध्ये आवडते चैनल यूजर्सला पाहता येत नव्हते. त्यामुळे आता GSAT -24 या सॅटेलाईट कोणत्याही भागातून कोणतेही चैनल पाहण्यासाठी आता प्रॉब्लेम येणार नाही.

   

आता 600 च्या ऐवजी 900 टीव्ही चॅनल पाहता येणार –

PIB नुसार GSAT -24 हे सॅटॅलाइट लॉन्च केल्यामुळे युजर्सला आता 600 च्या ऐवजी 900 टीव्ही चॅनल पाहता येईल. हे चॅनल पूर्व भारतापासून डोंगराळ प्रदेश, अंदमान आणि निकोबार, द्वीप समूहापर्यंत सर्वत्र पाहता येतील. एवढेच नाही तर या सॅटेलाईटमुळे पिक्चर कॉलिटी आणि साऊंड देखील परफेक्टली ऐकण्यास मिळू शकतो.यापूर्वी टाटा प्ले वर 600 चॅनल्स उपलब्ध होते. त्याचबरोबर टाटा प्ले च्या प्लॅटफॉर्मवर जोडण्यात आलेल्या नवीन 300 चॅनलसाठी यूजर्सला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाही. हे 300 नवीन चॅनल्स खास करून शैक्षणिक आणि मनोरंजन चॅनेल आहेत.

GSAT -24 काय आहे –

GSAT -24 हे एक 24 KU ब्रँड संचार सॅटॅलाइट आहे. DTH एप्लीकेशनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे सॅटेलाईट संपूर्ण भारतात कव्हरेज प्रदान करते. यासाठी लाईटचे वजन 4180 किलोग्राम एवढे आहे. देशातील अंतराळ संस्था इस्त्रोची व्यावसायिक शाखा असलेली न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ने हे सॅटेलाईट लॉन्च केले आहे. हे सॅटेलाईट मागच्या वर्षी दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गयाना येथील कौरो या फ्रेंच कंपनीने, एलियन स्पेस द्वारे संचलित एलियन 5 रॉकेटच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आले होते.