Upcoming Maruti Cars : मारुतीचा मोठा प्लॅन! लवकरच आणणार 10 नव्या Cars; 6 Electric गाड्यांचाही समावेश

टाइम्स मराठी (Upcoming Maruti Cars) | भारताची सर्वात मोठी कार कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. या कंपनीने नुकताच नवीन 3.1 व्हिजनची घोषणा केली आहे. त्यानुसार कंपनी आर्थिक वर्ष 2031 पर्यंत पंधरा लाख इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्लान करत आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि सस्टेनेबल सोल्युशन वर भर देण्यासाठी मारुती सुझुकी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. भारतात मारुती सुझुकी कंपनी 19 मॉडेलची विक्री करते. 2030- 31 पर्यंत 29 मॉडेलची विक्री करण्याचा उद्देश या कंपनीचा आहे. मारुती सुझुकी आगामी काळात 6 इलेक्ट्रिक कार्स आणि 10 नवीन मॉडेल सह बिझनेस वाढवण्याच्या तयारी मध्ये आहे.

   

मारुती सुझुकी कंपनी कारची विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करत असून 2031 पर्यंत या कंपनीने वार्षिक उत्पादन हे 4 मिलियन पर्यंत (Upcoming Maruti Cars) वाढवण्याची योजना बनवली आहे. या योजनेच्या माध्यमातून 15 टक्के म्हणजेच 600,000 युनिट्स इलेक्ट्रिक व्हेईकल आणि 1 मिलियन युनिट हायब्रीड वाहनांचे असतील. यानुसार कंपनी आर्थिक वर्ष 2031 पर्यंत 750000 युनिट पर्यंत ही कंपनी विक्री करू शकेल. कंपनीला निर्यातीमध्ये तिप्पट वाढ होण्याची आशा आहे.

2024 -25 पर्यंत पहिली इलेक्ट्रिक कार आणणार- (Upcoming Maruti Cars)

मारुती सुझुकी 4 मिलियन पैकी 3.2 मिलियन युनिट विक्री भारतीय बाजारपेठेमध्ये करणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक वर्षात चार मिलियन युनिट उत्पादन या उद्दिष्टानुसार कंपनी शेअरधारक यांचा विचार करून प्रत्येक वेळेस अवश्य पुनर्रचना कंपनीकडून वेळोवेळी जाहीर केली जाणार आहे. मारुती सुझुकीचे अध्यक्ष आरसी भार्गव यांनी सांगितलं की, गुजरात फॅसिलिटी मध्ये इलेक्ट्रिक वाहन डेव्हलप करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. 2030- 31 पर्यंत 6 मॉडेल्स बाजारामध्ये लॉन्च करणार (Upcoming Maruti Cars) असल्याची योजना आहे. तसेच 2024 -25 पर्यंत पहिली इलेक्ट्रिक व्हेईकल लॉन्च करण्याची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.