टाइम्स मराठी (Honda SP160)। भारतातील हिरो मोटोकॉर्प नंतर दुसरी सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी म्हणजे होंडा. आपल्या ग्राहकांना चांगल्या दर्जाची आणि वेगवेगळ्या फीचर्सनी परिपूर्ण अशी गाडी मिळावी यासाठी होंडा नेहमीच प्रयत्नशील असते. त्याच पार्श्वभूमीवर होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतामध्ये SP160 ही बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक 160 cc सेगमेंट मध्ये हिरो मोटर कार टीव्हीएस आणि बजाज यासारख्या पॉप्युलर कंपन्यांना टक्कर देऊ शकते. कंपनीने या बाईकची एक्स शोरूम किंमत 1,17,500 रुपये आणि ड्युअल डिस्क व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1,21,900 रुपये ठेवली आहे. चला होंडाच्या या नव्या गाडीचे खास फीचर्स जाणून घेऊयात.
दमदार फीचर्सने परिपूर्ण अशी बाईक –
Honda SP160 ही पूर्वीच्या बाईक पेक्षा बोल्ड, स्पोर्टी आणि स्टायलिश डिझाईनसह जबरदस्त पावर आणि शानदार परफॉर्मन्स मध्ये उपलब्ध आहे. ही बाईक दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. एवढेच नाही तर या बाईक मध्ये 6 कलर ऑप्शन देखील देण्यात आलेले आहे. SP 160 या बाईकच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये स्पोर्टी लूक देण्यात आलेला असून यामध्ये बोरल्ड टॅंक डिझाईन, एलईडी हॅन्डलॅम्प, एलईडी टेललॅम्प, स्पोर्टिं मफलर, क्रोम कव्हर, आणि 130 mm रियर टायर आणि काऊल च्या खाली एअरोडायनामिक देण्यात आले आहे.
या बाईकमध्ये 177mm ग्राउंड क्लिअरन्स आणि 1347mm विल बेस देण्यात आला आहे. या बाईकच्या सीटची लांबी 594mm एवढी असून डिजिटल मीटर देखील यामध्ये देण्यात आलेले आहे. या डिजिटल मीटर मध्ये घड्याळ, सर्विस ड्यू इंडिकेटर, गिअर पोझिशन इंडिकेटर, साईड स्टॅन्ड इंडिकेटर, फ्युल गेज देण्यात आले आहे. त्याचबरोबर बाईकच्या सिक्युरिटी साठी यामध्ये एबीएस सह पेटल डिस्क ब्रेक देखील देण्यात आला आहे.
160 cc इंजिन – (Honda SP160)
Honda SP160 मध्ये OBD2 कॉम्प्लायंट 160 cc प्रोग्राम्ड फ्युएल इंजेक्शन (PGM-FI) इंजिन देण्यात आले आहे. त्याचबरोबर या बाईच्या इंजिन मध्ये स्टॉप स्विच देखील उपलब्ध आहे. हे शॉर्ट स्टॉप बटन दाबल्यास इंजन बंद करता येऊ शकते. होंडाचे मार्केटिंग डायरेक्टर योगेश मात्र यांनी सांगितलं की, होंडा कंपनीने लॉन्च केलेली नवीन SP160 ही बाईक खास करून तरुण पिढीसाठी डिझाईन करण्यात आली आहे. ही बाईक चांगले फीचर्स आणि मायलेज देते करते. होंडा कंपनीची ही बाईक या महिन्याच्या अखेरीस डिलिव्हरी करण्यात येईल.