टाइम्स मराठी । बाईक्स घेण्याकडे तरुण पिढीचा मोठ्या प्रमाणात कल असतो. गाडी घेत असताना नेमकी कोणती गाडी घ्यायचा असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो. त्यानुसार गाडीचा लूक, तिचे मायलेज आणि महत्त्वाचे म्हणजे किंमत या सर्व गोष्टी पाहून आपण कोणती बाईक घ्यायची हे ठरवत असतो. भारतीय बाजारात सातत्याने नवनवीन बाईक्स येत लाँच होत असतात. त्यातही होंडा कंपनीच्या गाड्यांकडे ग्राहकांचा कल हा जास्त पाहायला मिळतो. नुकतीच होंडाने नवीन SP160 ही बाईक लॉन्च केली आहे. त्याचबरोबर होंडा कंपनीची युनिकॉर्न ही बाईक बऱ्याच वर्षापासून विकली जात आहे. होंडा यूनिकॉर्न आणि होंडा SP160 या दोन्ही 160cc च्या शानदार बाईक आहे. परंतु दोघांपैकी कोणती बाईक बेस्ट ठरेल हे आज आपण त्यांच्या तुलनेवरून जाणून घेणार आहोत.
लूक आणि डिझाईन –
SP 160 या बाईकच्या डिझाईन आणि फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर ही बाईक स्पोर्टी लूक देते. यामध्ये बोल्ड टॅंक डिझाईन, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, स्पोर्टिं मफलर, क्रोम कव्हर, आणि 130 mm रियर टायर आणि काऊल च्या खाली एअरोडायनामिक देण्यात आले आहे. या बाईकच्या सीटची लांबी 594mm एवढी असून डिजिटल मीटर देखील यामध्ये देण्यात आलेले आहे. या डिजिटल मीटर मध्ये घड्याळ, सर्विस ड्यू इंडिकेटर, गिअर पोझिशन इंडिकेटर, साईड स्टॅन्ड इंडिकेटर, फ्युल गेज देण्यात आले आहे. त्याचबरोबर बाईकच्या सिक्युरिटी साठी यामध्ये एबीएस सह पेटल डिस्क ब्रेक देखील देण्यात आला आहे.त्याचबरोबर या बाईकमध्ये 17 इंच अलॉय व्हील वर 130/70 सेक्शन रियर टायर लावण्यात आले आहे. यामुळे रोड ग्रीप उत्कृष्ट आहे.
युनिकॉर्न या बाईक मध्ये अनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे. यामध्ये फ्युल इंडिकेटर, स्पीडोमीटर, ट्रिप मीटर, गिअर पोझिशन इंडिकेटर देण्यात आलेले आहे. युनिकॉन मध्ये 18 इंचच्या अलॉय व्हील वर 100/90 सेक्शन रियर टायर लावण्यात आलं आहे. युनिकॉन ही बाईक ची लांबी 2081, उंची 1103 तर रुंदी 756 एवढी आहे. या बाईकच्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आलेली आहे. सिग्नेचर टेल लॅम्प, स्टायलिश अनलॉक मीटर, इंजिन स्टॉप स्विच, मोनोशॉक सस्पेन्शन, साईड स्टॅन्ड इंजिन कट ऑफ, आरामदायक सीट, मेंटेनन्स फ्री बॅटरी थ्रीडी विंग मार्क टॅंक देखील देण्यात आला आहे.
इंजिन –
Honda SP160 या बाईक मध्ये 160 cc इंजन देण्यात आलेले असून 5 स्पीड गिअर बॉक्स दिले आहे. ही बाईक 7500rpm वर 13.27 bhp पावर आणि 14.58 hm पिक टॉर्क जनरेट करते. SP 160 या बाईक मध्ये 12 लिटर फ्युल टॅंक कॅपॅसिटी उपलब्ध आहे. यासोबतच SP 160 होंडा कंपनीच्या या बाईक मध्ये OBD 2 कंप्लायंट 160 सीसी प्रोग्राम्ड फ्युल इंजेक्शन PGM-FI इंजिन देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या इंजिन सोबत सोलनॉईड वॉल्व देखील उपलब्ध आहे. या बाईकमध्ये स्मूद पावर डिलिव्हरी साठी रोलर रॉकर आर्म आणि काउंटर बॅलेन्सर देण्यात आले आहे.
दुसरीकडे होंडा युनिकोर्न बाईक मध्ये 162.71 cc इंजन उपलब्ध आहे. SP 160 आणि युनिकॉर्न या दोन्ही बाईक 7500 rpm वर 13.27 Bhp ची कमाल पॉवर आणि 5500 rpm वर 14.58 Nm पीक टॉर्क जनरेट करतात.. या दोन्ही बाइक मध्ये फ्यूल इंजेक्शन सिस्टीम देखील देण्यात आली आहे. एवढेच नाही तर कंपनीने दोन्ही बाइक्समध्ये 5 स्पीड गिअर बॉक्स दिले आहे. युनिकॉन मध्ये 13 लिटर फ्युल टॅंक कॅपॅसिटी उपलब्ध आहे. त्याचबरोबर या बाईकमध्ये हॅलोजन हेडलाईट आणि सिंगल डिस्क ब्रेक देखील उपलब्ध आहे.
किंमत किती?
होंडा SP160 सिंगल डिस्क वेरियंटची किंमत 1,17,500 रुपये एवढी आहे. तर याच्या डबल डिस्क व्हेरियंटची किंमत 1,21,900 एवढी आहे. त्याचबरोबर होंडा यूनिकॉर्न या बाईकची किंमत 1,09,800 एवढी देण्यात आलेली आहे. म्हणजेच होंडा युनिकॉर्न ही बाईक SP 160 यापेक्षा 7700 रुपयांनी स्वस्त आहे. आता दोन्ही गाड्यांची वरील सर्व फीचर्स, इंजिन क्षमता आणि किमतीनुसार तुम्हीच ठरवा कोणती बाईक तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.