टाइम्स मराठी । टाटा ग्रुपने गुरुवारी एअर इंडिया (Air India) साठी नवीन लोगो तयार केला आहे. यासोबतच टाटा ग्रुप (Tata Group)कडून एयर इंडिया मध्ये बऱ्याच सुधारणा करणे सुरू आहे. एअर इंडिया बऱ्याच वर्षापासून तोट्यात होती. अजून देखील यामध्ये काही फरक पडला नसून नवीन लॉन्चिंग मुळे एअर इंडिया चे रुपडे पालटू शकते. डाटा ग्रुपने फक्त लोगोज बदलला नसून एयर इंडिया चा ब्रॅण्डिंग, कलर देखील बदलण्यात आले आहे. गुरुवारी एअर इंडियाने एका लाईव्ह इव्हेंट मध्ये नवीन लोगो आणि डिझाईन लॉन्च केली. यासोबतच 470 नॅरो आणि वाईट बॉडी जेटच्या ऑर्डरचा रेकॉर्ड केल्यानंतर टाटा ग्रुपने एअर इंडिया चा नवीन लोगो वर रंगसंगती आजमावली आहे.
हा लोगो बघून प्रत्येकाच्या मुखातून वाव, अप्रतिम असे शब्द निघतील. या रंगसंगती मध्ये न्हाऊन निघालेले महाराजा आकृष्ट दिसत आहे. आधुनिक रूप स्टायलिश डिझाईन लाल पांढरा आणि नारंगी रंग यामुळे हा महाराजांचा लोगो आकर्षित करतो. एयर इंडियाच्या इव्हेंट वेळी नवीन टेल डिझाईन आणि थिंग सॉंग देखील लॉन्च केले आहे.
यावेळी टाटा सन्स चे अध्यक्ष चंद्रशेखरन म्हणाले की, नवीन लोगो हा अप्रतिम असून हा लोगो अमर्यादित शक्यतांचे प्रतीक असल्याचा आत्मविश्वास बरकरार करतो. यासोबतच एयर इंडिया ने लॉन्च केलेला हा लोगो एयरलाइन ची नवीन ओळख आणि रिबॉर्डिंग चा एक पार्ट आहे. एयर इंडिया हा बिझनेस नसून ती टाटा समूहाची आवड आहे. आणि ही आवड म्हणजे राष्ट्रीय मिशन देखील आहे. एयर इंडिया ला जागतिक दर्जाची निर्माण कंपनी बनवण्याचा प्रवास नुकता सुरू करण्यात आला असून तुम्ही पहात असलेला हा लोगो ऐतिहासिक दृष्ट्या आत्मविश्वास, प्रगती दर्शवतो. पंधरा महिन्यांच्या या प्रवासात एअर इंडियाला जगातील सर्वात उत्कृष्ट एक्सपिरीयन्स टेक्नॉलॉजी कस्टमर सर्विस आणि सेवा देणारी विमान कंपनी बनवू इच्छित आहोत. गेल्या वर्षभरात आम्ही एयर इंडिया मध्ये बऱ्याच सुधारणा केल्या आहेत असं एन. चंद्रशेखरन यांनी सांगितलं.
एयर इंडिया चा लॉन्च करण्यात आलेला नवीन लोगो एयर इंडियाने वापरलेल्या क्लासिक आणि आयकॉनिक भारतीय विंडो पासून प्रेरित आहे. एअर इंडियाच्या प्रवाशांना हा नवीन लोगो या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबर पर्यंत विमानांवर दिसेल. एयर इंडिया चे पहिले एअरबस विमान A350 हे देखील नवीन लोगोसह यामध्ये सामायिक होणार आहे.
एअर इंडियाचे सीईओ आणि एमडी कैपबेल विल्सन campbell wilson म्हणाले की, नवीन ब्रॅण्डिंग ने तयार करण्यात आलेली एअर इंडिया जगातील प्रवाशांना सैर करणारी आणि सेवा देणारी एक विश्वस्तरीय विमान कंपनी बनवण्याची महत्वकांक्षा दर्शवते. ही एअर इंडिया कंपनी नवीन लोगोसह फ्युचर ब्रांड ने मिळून डिझाईन केली असून या कंपनीमध्ये बरेच सुधार करण्यात येत आहे. या सोबतच ते म्हणाले की विमान दुरुस्तीसाठी 40 करोड डॉलर खर्च करण्यात आलेले आहे.एवढेच नाही तर लोगो लॉन्चिंग सोबतच एअर इंडिया ने नवीन वेबसाईट आणि मोबाईल ॲप देखील लाँच केले आहे. लवकरच कस्टमर केअरचा सेटअप देखील तयार करण्यात येणार आहे. एयर इंडिया चा लोगो महाराजा आयकॉन हा दशकांपासून एयर इंडिया आणि एअर लाईनच्या प्रवासाचा भाग आहे.