टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर आज- काल सर्वच जण सक्रिय असतात. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम Youtube यासारखे बरेच एप्लीकेशन उपलब्ध आहेत. फेसबुक आणि Instagram या दोघांचे फीचर्स हे एक सारखेच असले तरीही इंस्टाग्राम वर यूजर ची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. युजर्स मध्ये इंस्टाग्राम ची क्रेज मोठ्या प्रमाणात दिसून येते. इंस्टाग्राम वर स्टोरी टाकणे, फोटो पोस्ट करणे, व्हिडिओ पोस्ट करणे, रिल्स बनवणे या सर्व गोष्टींचा लाभ युजर्स घेत असतात. फेसबुकमध्ये देखील हे फीचर्स उपलब्ध असले तरीही instagram वापरणे तरुण पिढीला भावते. आता इंस्टाग्राम यूजर साठी नवीन फिचर लॉन्च करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून इंस्टाग्राम वापरणे आता आणखीनच सोपे होईल.
फेसबुक पेक्षा Instagram मोठ्या प्रमाणात वापरला जाते असं म्हणतात. Instagram रिल्स स्टोरीज या सर्वांसाठी प्रसिद्ध असून सर्वात खास गोष्ट म्हणजे जेव्हा इंस्टाग्राम वर फोटो पोस्ट करतो आणि त्या फोटोमध्ये जास्त लोक असतात. पण आपण त्यावेळी टॅग हा ऑप्शन वापरतो. परंतु आपण कमीत कमी दोन-तीन जणांना टॅग करू शकतो. पण ग्रुप फोटो मधील तीन पेक्षा जास्त लोकांना टॅग करणं हे मोठं कठीण काम आहे. यामुळे आता कंपनीने एक खास युक्ती लढवली आहे. म्हणजेच स्टोरी टेगिंग साठी देखील आता नवीन फिचर लॉन्च करण्यात येणार आहे. या फीचरच्या माध्यमातून स्टोरी किंवा पोस्टमध्ये तीन पेक्षा जास्त युजर्सला टॅग करणे सोपे होणार आहे. याबद्दल कंपनीचे प्रमुख एडम मोसेरी यांनी या ग्रुप टॅगिंग फिचरची घोषणा केली आहे. सध्या या फीचरचे टेस्टिंग सुरू असून लवकरच हे फीचर यूजर साठी खुले करण्यात येणार आहे.
अशाप्रकारे वर्क करेल ग्रुप टॅगिंग फिचर
रिपोर्टनुसार ग्रुप टॅगिंग फिचर मध्ये instagram यूजर्स ला ग्रुप बनवण्यासाठी परमिशन देईल. आणि जेव्हा या ग्रुपला कोणी टॅग करेल. तेव्हा ग्रुप मधील सर्वच युजर्स टॅग केले जातील. या फीचर बद्दल इतर अजून कोणतीच माहिती मिळालेली नसून एडम मोसेरी यांनी देखील फीचर कशाप्रकारे काम करेल याबद्दल माहिती दिलेली नाही.
Instagram चे प्रमुख एडम मोसेरी म्हणाले की, या फिचरला कोणत्याही स्टोरीमध्ये युजरच्या एका ग्रुपला टॅग करण्यासाठी टेस्टिंग सुरू आहे. यामुळे एकदा जर तुम्ही ग्रुप बनवला तर तर तुम्हाला एका एका व्यक्तीला टाईप करण्याची गरज भासणार नाही. एकदाच ग्रुपला टॅग केल्यानंतर सर्व मेंबर टॅग होतील.एडम मोसेरी यांनी इंस्टाग्राम वर मेसेज दिलेला असून ते म्हणाले की, जर यूजर त्यांच्या मित्रांसोबत टूरवर असतील तर त्या व्यक्तींना वेगवेगळे टॅग करण्याची गरज नसून ग्रुप पॅकिंग या ऑप्शन मुळे ते सहजतेने प्रत्येकाला टॅग करू शकतील.