CNG Kit : कोणत्या गाडीत CNG किट बसवू शकता? किती खर्च पडेल? पहा संपूर्ण माहिती

टाइम्स मराठी । (CNG Kit)आज-काल वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांची आणि CNG कार्सची चलती मोठ्या प्रमाणात आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य नागरिकांचा महिन्याचा खर्च कोलमडल्याचे दिसून येत आहे. अशातच बिना पेट्रोल डिझेल वाहन म्हटलं तर CNG हे ऑप्शन पुढे येतो . जर तुम्ही देखील तुमच्या कार मध्ये CNG Kit लावण्याचा विचार करत असाल तर यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. त्यानुसार तुम्ही CNG किटचा वापर करू शकाल. आणि एवढेच नाही तर त्यासाठी महत्त्वाचे प्रिकॉशन देखील तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

   

कोणत्या गाडीत CNG किट बसवू शकता-

केंद्र सरकारने सांगितलेल्या नियमानुसार, जर तुम्ही तुमच्या कार मध्ये सीएनजी किट लावू इच्छित असाल तर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कारचे वजन माहिती असणे गरजेचे आहे. ज्या वाहनांचे वजन 3.5 टनांपेक्षा कमी असेल अशा वाहनांमध्येच तुम्ही सीएनजी किट बसवू शकता.. यासाठी तुमच्या कारचे वजन आणि CNG किट यामध्ये समतोल असायला पाहिजे. जर तुमच्या कारचे वजन नियमाप्रमाणे परफेक्ट असेल तर तुम्हाला अजून एका गोष्टीचे पालन करावे लागेल. तुम्ही सीएनजी किट खरेदी करणार असाल तर ते अधिकृत डीलर पासूनच खरेदी करा. आणि खरेदी केलेले किट लावल्यानंतर त्यांच्याकडून बिल घेणे विसरू नका.

20181031103523 MG 0032

किंमत किती असू शकते – (CNG Kit)

CNG किटची किंमत ही 25000 ते 45000 रुपयांपर्यंत असते. जर तुम्ही बाजारातून सीएनजी किट खरेदी करत असाल तर तुम्ही हे नक्कीच चेक करा की तुमच्या किट मध्ये काही प्रॉब्लेम तर नाही. किंवा तुम्ही मेकॅनिक कडून देखील हे किट लावून घेऊ शकतात. म्हणजेच कोणताही प्रॉब्लेम उद्भवणार नाही.

CNG चे फायदे तोटे काय?

CNG हे जस फायदेशीर आहे तसाच ते तोट्यात सुद्धा जाऊ शकते. कसे ते आम्ही सांगतो. एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे ते परवडणारे नाही. या हिशोबाने CNG हे नाक्कीच्या त्यामानाने स्वस्त आहे. त्याचबरोबर सीएनजी किट लावल्यामुळे मायलेज देखील वाढते. परंतु जर तुम्ही सीएनजी कार खरेदी केलेली नसेल पण तुम्ही बाहेरून किट लावणार असाल तर सुरक्षेचा विषय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्भवतो. त्यामुळे हा धोका तुम्हाला पत्करावा लागेल.