Chandrayaan 3 च्या आधीच रशियाचे Luna 25 चंद्रावर कसं पोचणार? हे आहे मोठं कारण

टाइम्स मराठी | सध्या चंद्रयान (Chandrayaan 3) चंद्राच्या कक्षेमध्ये भ्रमण करत असून काही दिवसातच ही मोहीम अंतिम वळणावर पोहोचेल. सर्वांचे चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे लक्ष लागून आहे. भारताची ही तिसरी चंद्रयान मोहीम असून 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. 14 जुलैला चांद्रयान 3 लॉन्च करण्यात आले होते. यासोबतच एका महिन्यापूर्वी रशियाने देखील चंद्र मिशन लुना 25 लॉन्च (Luna 25) केले होते. हे रशियन लॅन्डर आणि भारतीय यान दोन्ही 23 ऑगस्टला चंद्रावर पोहोचेल असं सांगण्यात येत आहे. परंतु एका महिन्यापूर्वीच लॉन्च झालेल्या चंद्रयान 3 च्या अगोदरच लुना 25 हे चंद्राच्या पृष्ठभागाला कसं स्पर्श करण्यास यशस्वी ठरेल हा प्रश्न उद्भवत आहे.

   

काय आहे कारण?

रशियन यान ला चंद्राभोवती फिरण्यासाठी 5.5 दिवस लागतात. त्यानंतर 3 ते 7 दिवस चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्यापूर्वी 100 किलोमीटर अंतरावर चंद्राभोवती फिरेल. भारतीय यान हे रशियन यान पेक्षा उशिरा चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल. कारण भारतीय चांद्रयान 3 हे रशियन लुना 25 पेक्षा जास्त लांबचा प्रवास करत आहे. म्हणजे मोठा मार्ग असल्यामुळे भारतीय चांद्रयान रशियन यानापेक्षा थोडं उशिरा पोहोचेल. कारण चांद्रयान 3 हे पृथ्वीच्या आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेऊन कमी इंधनामध्ये प्रवास करत आहे.

रशियन यान हे सर्वात मोठे असून भारतीय यान छोटे आहे. यामुळे भारतीय चांद्रयान 3 हे वेगात चंद्राचा पृष्ठभागावर जाऊ शकत नाही. मोठे यान हे जास्त खर्चीक असते. आणि त्याचा वेग देखील जास्त असतो. कमी वेगामुळे आणि कमी खर्ची मध्ये असलेले हे भारतीय रॉकेट वेगात जाऊ शकत नाही. असं एका एक्सपर्ट ने सांगितलं आहे.भारतीय चांद्रयान हे कमी संसाधनांमध्ये तयार करण्यात आलेले असले तरी देखील भारत हे चांद्रयान मिशन पूर्ण करत आहे. आणि शास्त्रज्ञांनी हे मिशन लॉन्च देखील करून दाखवले. भारतीय चांद्रयान हे रशियन यानाच्या तुलनेत छोटे असले तरीही ते मिशन पूर्ण करून दाखवेल अशी आशा आहे.

दरम्यान, लुना 25 हे रशियाचे 1976 नंतरचे म्हणजे 47 वर्षानंतर रशियाचे पहिले चंद्रयान मिशन आहे. याबाबत इस्रो ने शुक्रवारी ट्विटरच्या माध्यमातून रशियन अंतरिक्ष एजन्सी रोस्कोस्मोस ला त्यांच्या चांद्रयान मिशनच्या यशस्वी लॉन्चिंग साठी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देताना त्यांनी ट्विटर वर लिहिले की, भारताच्या अंतराळ प्रवासामध्ये आणखीन एक भेट बिंदू असणे आश्चर्यकारक असून चांद्रयान तीन आणि लुना 25 या मिशनला त्यांचे लक्ष साध्य करण्यासाठी शुभेच्छा.