TVS ने आणली आकर्षक Electric Scooter; Ola, Ather ला देणार टक्कर

टाइम्स मराठी । वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे भाव पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे दिसून येत आहे. त्यामुळे वाढत्या मागणीमुळे आज काल सर्वच मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये त्यांचं लक आजमावतांना दिसत आहे. बऱ्याच कंपन्या इलेक्ट्रिक गाड्याचे प्रोडक्शन करून भारतीय बाजारपेठे मध्ये त्यांचे वर्चस्व टिकून ठेवत आहे. भारतात Ola आणि Ather कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटरला जास्त मागणी आहे. परंतु याच दोन कंपन्यांना तगडी फाईट देण्यासाठी TVS कंपनी लवकरच आपली नवी इलेक्ट्रिक स्कुटर Creon लाँच करणार आहे. येत्या २३ ऑगस्ट २०२३ ला दुबई मध्ये कंपनी ही स्कुटर सादर करणार आहे. आकर्षक लूक आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असलेली ही इलेक्ट्रिक स्कुटर नक्कीच ग्राहकांना भुरळ पाडेल.

   

काय आहेत फीचर्स –

Tvs Creon या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 40 mAh बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. ही स्कूटर 5.1 सेकंदात 60 kmph एवढे स्पीड वाढवू शकते. या Creon मध्ये 12000w ची पावर फुल मोटर देण्यात आलेली आहे. यासोबतच ही स्कूटर 16.31 ps पावर प्रदान करते. या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये led लाईट देण्यात आले असून यामुळे या स्कूटरला एक शार्प लुक येतो. ही स्कूटर एका तासात 80% चार्ज होते. तसेच एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर हि इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 80 किलोमीटर पर्यंत धावू शकेल.

किंमत किती असेल-

Tvs Creon या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये सेफ्टी साठी फ्रंट आणि रियर मध्ये डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. यासोबतच डिजिटल मीटर, जिपीएस, अँटी थ्रेप्ट उपलब्ध असून ही स्कूटर आरामदायक सीट प्रदान करते. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीचा खुलासा कंपनीकडून अजून करण्यात आलेला नाही. परंतु मिळालेल्या रिपोर्टनुसार ही स्कूटर 1.20 लाख रुपयांच्या शोरूम किमतीमध्ये उपलब्ध होऊ शकते.

Tvs Creon या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये ट्यूबलेस टायर देण्यात आलेले आहे. यासोबतच ब्लूटूथ इनबल्ड देखील यामध्ये उपलब्ध आहे. या स्कूटरमध्ये सेफ्टी साठी एबीएस सिस्टीम वापरण्यात आलेली असून ही स्कूटर व्हील सेंसर वर चालते. यासोबतच अचानक ब्रेक लावल्यास ही स्कूटर वाहन नियंत्रित करण्यासाठी अधिक वेळ प्रदान करते. या इलेक्ट्रिक स्कूटरची एबीएस सिस्टीम ही सामान्य ब्रेकिंग सिस्टीम पेक्षा प्रभावी आहे. टीव्हीएस कंपनीची ही Creon इलेक्ट्रिक स्कूटर Ather 450X आणि Ola S १ Air ला जोरदार टक्कर देईल.