अधिकमासातील अमावस्येचे विशेष महत्त्व; आज ‘या’ गोष्टी केल्यास मिळू शकते यश

टाइम्स मराठी | हिंदू धर्मात अधिकमासाला (Adhik Maas 2023) सर्वात जास्त महत्त्व आहे. या महिन्यात व्रत, उपासना, जप, तपश्चर्या अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि त्या मानल्या देखील जातात. अधिकमासाची अमावस्या आणि पौर्णिमा तर एका सणाप्रमाणे साजरी करण्यात येते. यावेळेस अधिकमासात तीन वर्षांनी अमावस्या आली आहे. यामुळे या दिवसात पितरांना पिंडदान गरजूंना दान, तर्पण अशा बऱ्याच गोष्टी करण्यात येतात. अधिक मास पाळल्यामुळे घरात सुख शांती येते अशी भावना अनेकांची आहे. तसेच या काळात चांगले काम केल्यास यशप्राप्ती होते.

   

अमावस्येचे विशेष महत्त्व

तसेच या अधिकमासात कुंडलीतून पितृदोषाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी या दिवशी शिवलिंगावर पाणी, दूध, दही, मध आणि काळे तीळ अर्पण केल्यास त्याचा लाभ मिळतो. त्याचबरोबर, अधिकमास अमावस्येच्या दिवशी पितृसूक्त पठण केल्यास वैवाहिक जीवनातील हिरावून गेलेल्या आनंद पुन्हा येतो. मुख्य म्हणजे, या वर्षीच्या अधिकमासात 16 ऑगस्टला म्हणजेच आज अमावस्या आली आहे. आजच्या दिवशी जर आपण पवित्र स्नान करून देवाची पूजा केली तर आपल्याला नक्कीच योग्य फळ मिळते.

हे कार्य केल्यास पुण्य मिळेल

तसेच या अमावस्येच्या दिवशी आपण गरजूंना दान केल्यास देखील आपल्याला पुण्यप्राप्ती होते. त्यामुळे आजच्या अमावस्येला दान अमावस्या देखील म्हटले जाते. हिंदू पुराणांमध्ये या दान अमावस्येला अधिक महत्त्व आहे. शुभ-अशुभ संकेतदेव पितृकाल हा पितरांसाठी आणि स्नान दान हे त्यांच्या शुभ कार्याच्या प्राप्तीसाठी करण्यात येते. आजच्या दिवशी जर पवित्र नद्यांमध्ये, गंगाजलमध्ये स्नान करून जर आपण पुण्याचे काम केले तर देव देखील आपल्यावर प्रसन्न होतो. तसेच जर आपण पंचांगणाप्रमाणे योग्य वेळी सर्व क्रिया केल्या तर याचा अधिक लाभ मिळतो.

पितरांना दान करण्यासाठी योग्य वेळ

या अमावस्येच्या दिवशी पंचांगं पाहून आपल्या प्रवासाची वेळ आणि दिशा ठरवावी. तसेच आजच्या दिवशी दीर्घायुष्य आणि मृत्यूचे भय दूर करण्यासाठी शिवलिंगावर पांढरे आक फूल, बेलपत्र अर्पण करावे. विशेष म्हणजे अधिक मासातील अमावस्या तिथी पितरांसाठी सर्वात महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आजच्या दिवशी पितरांना श्राद्ध आणि जल अर्पण करावे. या अमावस्येला जर आपण देवाचे सतत स्मरण केले तर याचा लाभ आपल्याला मिळतो. अशा अनेक कारणांसाठी आजची अमावस्या सर्वात जास्त महत्त्वाची आहे.