Mahindra OJA Tractor : महिंद्राने लाँच केला मिनी ट्रॅक्टर; शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान, किंमतही कमी

टाइम्स मराठी । महिंद्रा अँड महिंद्रा ने नुकताच Mahindra OJA Tractor लॉन्च केला आहे. दक्षिण आफ्रिकेची राजधानी केप टाऊन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या फ्युचरस्केप कार्यक्रमात महिंद्रा ग्रुप ने महिंद्रा OJA हा ट्रॅक्टर लॉन्च केला. या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 5.64 लाख रुपये एवढी आहे. महिंद्रा कंपनीने OJA च्या तीन नवीन प्लॅटफॉर्मवर हे ट्रॅक्टर लॉन्च केले असून यात सब कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट आणि स्मॉल युटीलिटी प्लॅटफॉर्म यांचा समावेश होतो.

   

1200 कोटींची गुंतवणूक –

महिंद्रा ट्रॅक्टर ही जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर निर्माता कंपनी आहे. महिंद्रा ने भारतीय बाजारपेठेसाठी सात नवीन ट्रॅक्टर मॉडेल कॉम्पॅक्ट आणि स्मॉल युटीलिटी प्लॅटफॉर्मवर 4WD मानकासह लॉन्च केले आहे. OjA हे महिंद्राची सर्वात महत्वकांक्षी ग्लोबल लाईट ट्रॅक्टर प्लॅटफॉर्म असून भारतात महिंद्रा रिसर्च व्हॅलीच्या इंजिनिअरिंग ग्रुप, महिंद्रा एएफएसचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, जपानचे मित्सुबिशी एग्रीकल्चर मशिनरी यांच्याकडून 1200 करोड रुपयांच्या गुंतवणुकीसह डेव्हलप करण्यात आले आहे. नवीन ओजेए रेंज लाईट वेट 4WD ट्रॅक्टर डिझाईन आणि इंजीनियरिंग मध्ये बदल घडवून आणू शकते. यामुळे या ट्रॅक्टर टेक्नॉलॉजी मध्ये अत्याधुनिक नाविन्यता आणू शकेल.

किंमत किती? (Mahindra OJA Tractor)

महिंद्रा कंपनीची OJA 27 HP या ट्रॅक्टरची किंमत 5.64 लाख रुपये एवढी असून OJA 40 HP ट्रॅक्टरची किंमत 7.35 लाख रुपये एवढी आहे. देशांतर्गत ट्रॅक्टर बाजार मध्ये महिंद्राची हिस्सेदारी 42 टक्के एवढी असून मागच्या वर्षी भारतात कंपनीची ट्रॅक्टर विक्री 9.45 लाख युनिट एवढी झाली होती. भारतामध्ये हे ट्रॅक्टर लॉन्च झाल्यानंतर उत्तर अमेरिका, आसियान, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, युरोप आणि सार्क प्रदेशांमध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. महिंद्रा कंपनीने मागच्या वर्षी 18,000 ट्रॅक्टर विक्री केले होते.

महिंद्रा कंपनीच्या फार्म इक्विपमेंट सेक्टर मधील प्रेसिडेंट हेमंत सिक्का यांनी सांगितलं की, कमी वजनाच्या ट्रॅक्टरचा (Mahindra OJA Tractor) उद्देश हा प्रगतिशील शेतकऱ्यांना लक्ष केंद्रित करून बनवण्यात आले आहे. महिंद्राची ही OJA एनर्जीचे एक पावर हाऊस आहे. नाविन्य आणि तंत्रज्ञानासह OJA ट्रॅक्टर हे महिंद्रा ला वैश्विक ट्रॅक्टर उद्योगांमध्ये 25% संबोधित करण्यात सशक्त बनवतो. यासोबतच युरोप आणि आशियायी यासारख्या नवीन बाजारपेठेंमध्ये लक आजमावण्यासाठी देखील प्रेरित करते. आम्ही तीन वर्षापासून ट्रॅक्टरची विक्री दुप्पट करू इच्छित आहोत. यासाठी नवीन लॉन्च करण्यात आलेला हा ट्रॅक्टर उपयुक्त ठरेल.