टाइम्स मराठी । बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपले लक आजमावण्यापूर्वी बऱ्याच एक्ट्रेसला आणि ऍक्टरला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. त्यानंतर बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांना त्यांची जागा मिळवण्यासाठी किंवा त्यांची खास ओळख बनवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. हे स्ट्रगल फक्त इंडस्ट्री पासून लांब असलेल्या व्यक्तींसाठीच नाही तर स्टार किड्स साठी देखील कठीण असतं. परंतु यातून नावारूपाला येऊन बरेच जण नवाब बनतात. अशाच एका स्टार किड्स आणि नवाबचा आज वाढदिवस (Saif Ali Khan Birthday) आहे. हा नवाब म्हणजेच सेफ अली खान. तर जाणून घेऊया आज त्यांच्या बद्दल काही खास माहिती.
नवाब घराण्यात झाला सैफचा जन्म –
बॉलीवूडचा छोटा नवाब म्हणून ओळख असलेले सेफ अली खान यांचा जन्म 16 ऑगस्ट 1970 मध्ये दिल्लीमध्ये झाला होता. त्यांचा जन्म नवाबांच्या घरात झाला. परंतु सैफ अली खान ने बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये स्वतःच्या हिमतीवर वेगळे स्थान निर्माण केले. सेफ च्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात ही यश चोप्रा यांच्या बॅनरखाली बनलेल्या परंपरा या चित्रपटातून झाली. त्यानंतर दिल्लगी मै खिलाडी तु अनाडी या रोमँटिक ड्रामा मधून खास ओळख मिळाली.
सेफ अली खान त्याची पत्नी करीना कपूर खान आणि मुलांसोबत 53 वा वाढदिवस साजरा (Saif Ali Khan Birthday) करत आहे. करीना कपूर ने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. सेफ आणि करीना चे लग्न 2012 मध्ये झाले होते. परंतु सैफ हा करीना पेक्षा दहा वर्षांनी मोठा असल्यामुळे बऱ्याच जणांनी त्यांच्यावर टीका केली होती. परंतु सैफ आणि करीनाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांचे नातं पूर्णपणे टिकवून ठेवलं.
लग्नापूर्वी करिनाने ठेवली होती ‘ही’ अट – (Saif Ali Khan Birthday)
एका मुलाखतीमध्ये करीनाला प्रश्न विचारण्यात आला होता की सेफ सोबत तिने लग्न का केलं. यावर ती म्हणाली होती की, मला स्वावलंबी राहायला जास्त आवडतं. आणि मला लग्नानंतर देखील चित्रपटांमध्ये काम करायचे होते. लग्न पत्नी आणि आई झाल्यानंतर देखील मला माझ्या करिअर मध्ये कोणत्या गोष्टीचा परिणाम झालेला नको होता. करीना कपूर ने सैफ अली खान सोबत लग्न करण्यापूर्वी एक अट घातली होती. ही अट म्हणजे लग्नानंतर सुद्धा चित्रपट सृष्टी मध्ये करिअर करण्याची होती. यावर सैफ अली खानचा नकार नसल्यामुळे मी लग्नाला तयार झाले असे करीनाने सांगितलं.
सैफ करीना प्रेमात कधी पडले –
करीना कपूर आणि सैफ अली खान टशन या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यानंतर कुर्बान या चित्रपटांमध्ये देखील दोघांची रोमांटिक केमिस्ट्री बघायला मिळाली. या दोघांची केमिस्ट्री लोकांना मोठ्या प्रमाणात आवडते. सैफ अली खानने करीना कपूर सोबत लग्न करण्यापूर्वी अमृता सिंह सोबत लग्न गाठ बांधली होती. त्यांनी 1991 मध्ये लग्न केले होते. तेरा वर्षानंतर सैफ आणि अमृताने 2004 मध्ये एकमेकांना तलाक दिला.