टाइम्स मराठी । भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे अलिबाग या ठिकाणी असलेल्या त्यांच्या आठ एकर जमिनीबाबत विचारपूस करण्यासाठी भेट देताना दिसला . या ठिकाणी त्यांचे फार्म हाऊस असून त्याचे कंट्रक्शन सध्या सुरू आहे. यासोबतच याठिकाणी विराट कोहली कॅम्पस मध्ये क्रिकेट खेळपट्टीची योजना करत असल्याची माहिती रिपोर्टनुसार उघड झाली होती. ही माहिती कितपत खरी आहे हे आता स्वतः विराट कोहलीने सांगितले आहे.
विराट कोहली हे अलिबाग येथे त्यांच्या घराच्या कन्स्ट्रक्शन चे काम बघण्यासाठी गेला होता. या ठिकाणी 20 करोड रुपये खर्च करून क्रिकेट पीच बनवण्यात येत असल्याची बातमी उघड झाली होती. यावर विराट कोहलीचे फॅन्स देखील शॉक झाले होते. एवढेच नाही तर स्वतः विराट कोहली देखील या बातमीवर शॉक होता. यानंतर त्याने आपल्या इंस्टाग्राम वर पोस्ट करून सत्य काय आहे ते सांगितलं. यावेळी अलिबाग येथे कन्स्ट्रक्शन सुरू असलेल्या प्लॉटवर कोणत्याच प्रकारचं क्रिकेट पीच बनवण्यात येत नसल्याचं विराटने स्पष्ट केलं. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट करून कॅप्शन दिले की, जो न्यूज पेपर लहानपणापासून वाचत होतो तो न्यूज पेपर देखील आता फेक न्यूज छापत आहे.
दरम्यान, अलिबागमध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ने आठ एकरचा फ्लॅट खरेदी केला आहे. या प्लॉटची किंमत 19.24 करोड रुपये एवढी असून स्टॅम्प ड्युटी मध्ये त्यांना 1.25 करोड रुपये पेमेंट करावे लागले. विराट कोहलीचे हे घर 18 ते 24 महिन्यांमध्ये तयार होणार असून समुद्र किनाऱ्यालगत आहे.
यापूर्वीही कोहलीबाबत फेक न्यूज –
विराट कोहली बद्दल सतत फेक न्यूज येत असतात. याच महिन्यात आणखीन एक फेक न्युज त्याच्याबद्दल ऐकण्यात आली होती. ही फेक न्युज म्हणजे तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी 11.45 करोड रुपये चार्ज करतो. परंतु तसं काही नसून याबद्दल विराट कोहलीने ट्विटर हँडलवर पोस्ट करून माहिती दिली होती. आणि त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, आयुष्यात जे काही मिळालं आहे त्यासाठी मी आभारी आणि ऋणी आहे. परंतु सोशल मीडियावर माझ्या कमाईबद्दल काही चुकीची माहिती पसरत आहे.