टाइम्स मराठी ऑनलाईन । सध्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीत मोठ्या उलाढाली होत आहेत. बाजारात एकसे बढकर एक कार येत असून स्पर्धा वाढली आहे. त्यात इलेक्ट्रिक गाड्यांचीही मागणी वाढली असल्याने कंपन्यांमध्ये जास्त सेल होण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. कोणाची गाडी सर्वात स्मूथ चालते अन चांगले मायलेज देते तेच या मार्केटमध्ये टिकणार आहेत. त्यामुळे मारुती सुझुकीपासून ते टोयोटा पर्यंत सर्वच कंपन्या आपल्या गाड्या ऑटोमॅटिक आणि चांगल्या मायलेज देणाऱ्या इंजिनसह बाजारात लाँच करत आहेत. आज आपण देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार्स कोणत्या हे जाणून घेणारा आहोत.
Alto K 10
या यादीत सगळ्यात पहिला क्रमांक मारुती सुजुकीच्या सर्वात प्रसिद्ध कारांपैकी एक असणाऱ्या अल्टो के 10 चा. या कारमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक गिअरचा पर्याय मिळतो, तसेच 1.0 लीटर चे पेट्रोल इंजिन सुद्धा मिळते. या कारची विशेष बाब म्हणजे ही कार अगदी कॉम्पॅक्ट आणि शहरात फिरण्यासाठी एक योग्य पर्याय आहे. या कारचा ऑटोमॅटिक व्हेरिएन्ट 5.61 लाख रुपये एक्स शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
अल्टो 10 ला तुम्ही पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही मॉडेल्स मध्ये खरेदी करू शकता. या कारमध्ये असणारे टच स्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम, ड्युअल एयरबॅग, एबीएस, ईबीडी हे फिचर्स कारला आणखी विशेष बनवते. ही कार 7 रंगामध्ये उपलब्ध आहे.
Kwid
रेनोची बजट हैचबैक तुम्हाला ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत मिळेल. कारमध्ये 1.0 लीटर चे पेट्रोल इंजिन सुद्धा मिळते. आधी क्विड 800 सीसी इंजिन सोबत मिळत होती, पण बीएस 6 फेज 2 लागू करण्यात आल्या नंतर या कंपनीने याचे 800 सीसी इंजिन असलेले मॉडेल बंद केले. सोबतच, या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सुद्धा देण्यात आले आहे. शहरात फिरण्यासाठी क्विड सुद्धा एक चांगले पर्याय आहे.
रेनो क्विडची एक्स शोरूम किंमत ऑटोमॅटिक व्हेरिएन्ट 6.33 लाख रुपये मध्ये उपलब्ध आहे. सोबतच यामध्ये सगळ्यात महत्वाचा फिचर म्हणजे याचा गिअर शिफ्ट नॉब आहे. तसेच, इंफोटेंमेंट सिस्टम, स्टिअरिंग कंट्रोल,ड्युअल एयरबॅग, सेंट्रल लॉकिंग, इंजिन इमोबिलाइजर,एबीएस, ईबीडी,, रिअर पार्किंग सेंसर यासारखे फीचर्स सुद्धा मिळेल.
TATA Tiago
तुम्हाला जर एक दमदार आणि बजेट मध्ये असलेली एक कार हवी असेल, तर तुमच्या साठी टाटा टिआगो हे एक योग्य व चांगले पर्याय आहे. टाटा टिआगोमध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्स दिला आहे. यामाध्ये 1.2 लीटर चे पेट्रोल इंजिन आहे. कारची परफॉर्मेंस खूप चांगली आहे. ही कार पेट्रोल, सीएनजी व आता इलेक्ट्रिकल व्हीकल सोबत देखील उपलब्ध आहे.
टिआगो ग्लोबल एनसीएपी रेटिंगमध्ये 4 स्टार मिळवणाऱ्या कारांपैकी एक आहे आणि सोबतच, या कारला खूप सुरक्षित कार देखील घोषित केले आहे. किंमतीचा जर विचार केला तर, ऑटोमॅटिक व्हेरिएन्ट 6.95 लाख रुपये किंमतीत एक्स शोरूम मध्ये उपलब्ध आहे.
Wagon R
दोन दशकांहून अधिक काळ देशावर राज्य करत असलेल्या मारुती सुजुकीच्या वॅगन आरचा ही यात समावेश आहे. 1.0 आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिन या पर्यायी सोबत वेगन आर ही ऑटोमॅटिक व्हेरिएंट खूप प्रसिद्ध आहे. कारचा परफॉर्मन्स देखील खूप चांगला आहे आणि शहरात फिरण्यासाठी हा एक चांगला पर्याय असल्यामुळे बऱ्याच काळापासून लोकांनी या कारला खूप पसंती दिली आहे. वॅगन आर ऑटोमॅटिकच्या किमतीचा जर विचार केला गेला तर 6.83 लाख रुपये एक्स शोरूम वर ही कार उपलब्ध आहे.