TATA MOTORS : टाटांच्या नव्या गाडीने मार्केट केलं जाम! सनरुफ अन इतर 5 स्टार फीचर्स असूनदेखील किंमत कमी..

TATA MOTORS । देशातील आघाडीची वाहन निर्मिती करणाऱ्या टाटा मोटर्सने नुकतीच आपल्या प्रसिद्ध TATA Altroz या गाडीचे CNG व्हेरिअंट बाजारात आणलं आहे, हे व्हेरिएंट बाजारात आणताना कंपनीने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाचाही विचार केल्याचं दिसून येत आहे, नवीन लॉंच केलेल्या या गाडीत ग्राहकांना Altroz च्या सगळ्या व्हेरिएंट मध्ये सनरुफ चा आनंद घेता येणार आहे.

   

विशेष म्हणजे छोट्या कारमध्ये सनरुफ ची सुविधा देणारी Tata Altroz ही केवळ दुसरी गाडी आहे. यासह कंपनीने अनेक चांगल्या फिचर चाही समावेश या गाडीत केला असून त्यात वायरलेस चार्जर, एअर प्युरीफायर व अन्य फिचरचा समावेश आहे. यापूर्वी केवळ पेट्रोल व डिझेल वर असलेली ही गाडी आता CNG मध्ये ही उपलब्ध असणार असून या गाडीची सनरुफ शिवायची किंमत 7.90 लक्ष (TATA MOTORS शोरूम) पासून सुरू होणार आहे.

Altroz च्या मिड-स्पेक XM- ट्रिम या मॉडेल ग्राहकांना सनरुफचा आनंद घेता येणार आहे. Tata Altroz चे कंपनीने पेट्रोल, डिझेल व CNG मध्ये एकूण 42 व्हेरिएंट बाजारात आणले असून यात ऑटोमॅटिक व्हेरिएंट चा देखील समावेश आहे. Tata Altroz च्या पेट्रोल गाडीचे इंजिन हे 1199 cc चं असणार आहे तर डिझेल गाडीचं इंजिन 1497 cc चं असणार आहे, पेट्रोलला ही गाडी प्रति लिटर 19.33 चं व डिझेलला 23.64 इतकं मायलेज देईल असं Tata Motors च्या वतीने सांगण्यात आले आहे.

सुरक्षेच्या बाबतीत नादच न्हाय!!!

गाडीची निर्मिती करताना TATA MOTORS कंपनी सुरक्षेकडे विशेष लक्ष दिल्याचं दिसून येत आहे. यात दोन एअर बॅग सह रिअर पार्किंग सेन्सर, ISOFIX चाईल्ड-सीट अँकर, ऑटो पार्क लॉक यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत यासह 7 इंचाचा इन्फोटेन्मेंट टचस्क्रीन मिळणार आहे तसेच एंबीएंट लायटनिंग व क्रूझ कंट्रोल सारख्या सुविधा ही असणार आहेत. NCAP च्या क्रॅश टेस्ट मध्ये Tata Altroz ला सुरक्षततेबद्दल 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.