Audi Q8 E-Tron इलेक्ट्रिक SUV भारतात लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी (Audi Q8 E-Tron) । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनाकडे वळत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणल्या आणि ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद या गाडयांना मिळत असल्याचे आपण पाहतोय. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध लक्झरी ब्रँड Audi ने आपली Q8 e-tron ही इलेक्ट्रिक SUV अपडेटेड व्हर्जन सह भारतात लॉन्च केली आहे. अतिशय आकर्षक लूक आणि दमदार फीचर्सने सुसज्ज असलेली ही कार पाहून तुम्हालाही या गाडीची भुरळ पडेल. आज आपण Audi च्या या इलेक्ट्रिक कारची फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत.

   

लूक आणि डिझाईन – (Audi Q8 E-Tron)

Audi Q8 E-Tron च्या या अपडेटेड व्हर्जन मध्ये आकर्षक लूक आणि डिझाईन देण्यात आलेलं आहे. कारच्या बाहेरील भागात नवीन बॉडीवर्कसह रीवर्क केलेले ग्रिल, लाइट्स, बंपर आणि टेलगेट मिळते. बंपरच्या डिझाइनमध्येही बदल करण्यात आला आहे. आधीच्या गाडीपेक्षा हे अपडेटेड व्हर्जन खूपच आकर्षक दिसत आहे.

Audi Q8 E Tron 2

600 किलोमीटर पर्यंत रेंज –

या कारमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर आहेत, ज्या एकत्रितपणे 408 hp पॉवर आणि 664 Nm टॉर्क जनरेट करतात. तसेच Audi Q8 E-Tron मध्ये 114kWh बॅटरी पॅक मिळते. DC फास्ट चार्जरने ही बॅटरी फक्त 31 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकतो. तसेच एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर Audi ची ही इलेक्ट्रिक SUV तब्बल ६०० किलोमीटर पर्यंत धावू शकते. ही कार केवळ 5.6 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यास सक्षम आहे.

अन्य फीचर्स –

गाडीच्या अन्य वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं झाल्यास यामध्ये मेमरी फंक्शन, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा, 16-स्पीकर बँग आणि ओलुफसेन ऑडिओ सिस्टम, हीटिंग, वेंटिलेशन आणि मसाजसह इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स यांसारखे फीचर्स मिळतात. तसेच कारच्या दोन्ही बाजूंना ट्विन चार्जिंग पोर्ट्स देण्यात आले आहेत.

Audi Q8 E Tron 1

किंमत किती?

गाडीच्या किमतीबाबत सांगायचं झाल्यास, कंपनीने Audi Q8 E-Tron ची सुरुवातीची किंमत 1.13 कोटी रुपये ठेवली आहे. तुम्ही ही इलेक्ट्रिक SUV क्रोनोस ग्रे, ग्लेशियर व्हाईट, मिथॉस ब्लॅक, प्लाझ्मा ब्लू, सोनेरा रेड, मॅग्नेट ग्रे, सियाम बेज, मडेरा ब्राउन आणि मॅनहॅटन ग्रे या रंगात खरेदी करू शकता.