Electric Scooter : 110 KM रेंज सह लाँच झाली दमदार Electric Scooter; Ola, Ather ला देणार टक्कर

टाइम्स मराठी । पेट्रोल डिझेलचे वाढते भाव पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक गाड्यांकडे (Electric Scooter) मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक स्कुटर आणि बाईक बनवण्याकडे लक्ष केंद्रित करत आहे. त्याचबरोबर ग्राहकांना परवडेल अशा किमतीत दमदार आणि आकर्षक गाडी उपलब्ध करून देण्याकडे कंपन्या भर देत असतात. भारतात ओला, TVS, एथर आणि बजाज या इलेक्ट्रिक स्कुटर बनवणाऱ्या टॉपच्या कंपन्या मानल्या जातात. परंतु याच स्कुटरला टक्कर देण्यासाठी गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सने आपली नवी इलेक्ट्रिक स्कुटर Eblu Feo लाँच केली आहे. ही स्कुटर एका चार्ज वर तब्बल ११० किलोमीटर रेंज देते. गोदावरी कंपनीने लॉन्च केलेली ही स्कूटर सिंगल वेरियंट मध्ये उपलब्ध असून स्कूटर ची किंमत 99,999 रुपये एवढी आहे. आज आपण या इलेक्ट्रिक स्कुटरचे फीचर्स जाणून घेऊयात.

   

110 किलोमीटर रेंज – (Electric Scooter)

गोदावरी कंपनीच्या Eblu Feo या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2.52 kW ची लिथियम – ऑयन बॅटरी देण्यात आलेली असून ही बॅटरी 110 Nm टॉर्क जनरेट करते. या स्कुटर मध्ये इकॉनोमल आणि पावर यासारखे तीन रायडिंग मोड देण्यात आलेले आहे. ही स्कूटर सिंगल चार्जवर 110 किलोमीटर रेंज असून तिचे टॉप स्पीड 60 किलोमीटर प्रति तास एवढे आहे.

लूक आणि डिझाईन –

Eblu Feo स्कूटर ऍडजेस्टेबल स्कूटर (Electric Scooter) असून स्कूटर ची लांबी 1850mm, हाईट 1140mm आणि व्हीलबेस 1345mm देण्यात आलेला अआहे. याशिवाय या इलेक्ट्रिक स्कुटरला 170 mm इतका ग्राउंड क्लिअरन्स मिळतोय. Eblu Feo इलेक्ट्रिक स्कुटर मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन, ड्युल ट्यून शॉकर, प्रांत आणि रियल सीबीएस डिस्क ब्रेक, हाय रिजॉल्युशन एएचओ एलईडी हेड लॅम्प, आणि एलईडी टेललॅम्प देण्यात आलेले आहे.त्याचबरोबर साईड स्टॅन्ड मध्ये सेंसर इंडिकेटर, 12 इंच ट्यूबलेस टायर, फ्लोर बोर्ड यासारखे फीचर्स उपलब्ध आहेत.

कनेक्टिव्हिटी –

Eblu Feo या स्कूटरच्या (Electric Scooter) कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायचं झालं तर या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कंव्हीनियस बॉक्स, मोबाईल चार्जिंग पॉइंट, 7.4 इंच डिजिटल फुल कलर डिस्प्ले, नेव्हिगेशन असिस्टंट, इन्कमिंग मेसेज अलर्ट, कॉल अलर्ट, मोड्स डिस्प्ले, रिवर्स इन्विकेटर्स, बॅटरी एसओसी इंडिकेटर, थ्रोटल फॉल्ट सेंसर, मोटर फोल्ड सेंसर, बॅटरी अलर्ट आणि हेल्मेट इंडिकेटर यासारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स कंपनीने Eblu Feo या स्कूटर वर फायनान्स उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी कंपनीने प्रमुख संस्थांसोबत पार्टनरशिप केलेली असून यामध्ये आयडीबीआय बँक, सीडबी, बजाज फिन्सर्व, कोटक महिंद्रा बँक, पेटेल, इजेड फायनान्स, छत्तीसगड ग्रामीण बँक, रेवफिन, एमु लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड, पैसाला यांचा समावेश आहे. कंपनीने या स्कूटर वर तीन वर्ष आणि तीस हजार किलोमीटरची वारंटी ऑफर केलेली आहे.

या स्कूटर बद्दल गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे सीईओ हैदर खान यांनी सांगितलं की, ही स्कूटर एक आरामदायक स्कुटर आहे. या स्कूटर च्या माध्यमातून ग्राहकांना जबरदस्त परफॉर्मन्स आणि सुरक्षा मिळते. आम्ही इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनांच्या विक्री बद्दल खूप उत्साहीत असून आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करू शकू अशी आमची खात्री आहे. त्याचबरोबर आम्ही रायपूर मध्ये प्रत्येक महिन्यात 4000 इलेक्ट्रिक स्कूटर युनिट उत्पादन करू शकतो. त्याचबरोबर या वर्षाच्या शेवटी 12000 ते 15000 युनिट विक्री करणे हा आमचा उद्देश आहे.