Indian Railways : वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांसाठी IRCTC चे परवडणारे टूर पॅकेज; खाणं- पिणं फुकट

टाइम्स मराठी । एखाद्या लांबच्या प्रवासाला जायचे असल्यास आरामदायी आणि सोयीस्कर प्रवास भारतीय रेल्वेकडे (Indian Railways) पाहिले जाते. रेल्वेने आपण आरामदायी आणि निवांत प्रवासाचा आनंद घेत आपला प्रवास एन्जॉय करतो. त्याचबरोबर भारतीय रेल्वे कडून प्रवाशांना कोणत्या अडचणी येऊ नये आणि सर्व सुख सुविधा मिळाव्या यासाठी सुद्धा काळजी घेतली जाते. भारतात अनेक देव देवतांची मोठमोठी मंदिरे असून भाविक सतत या मंदिरांना भेट देऊन देवाचे दर्शन घेत असतात. वैष्णोदेवी हे सुद्धा असच एक मंदिर आहे ज्याठिकाणी जाऊन दर्शन घेणं प्रत्येक भारतीयांचे स्वप्न असत. तुम्ही सुद्धा वैष्णोदेवीचे दर्शन घेणार असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी एक खास आणि परवडणारे टूर पॅकेज आणलं आहे.

   

जर तुम्ही वैष्णोदेवी जाण्यासाठी टूर काढत असाल तर प्रवाशांसाठी एक खास पॅकेज भारतीय रेल्वेने (Indian Railways) जाहीर केले आहे. या पॅकेजचे नाव Mata Vaishnodevi Devi EX Varanasi हे आहे. याबाबत भारतीय रेल्वेने ट्विट करून प्रवाशांना माहिती दिली. या पॅकेज अंतर्गत अत्यंत कमी किमतीमध्ये तुम्ही देवीचे दर्शन घेऊ शकता. यासोबतच ट्रेनच्या माध्यमातून वाराणसी, जोनपुर, सुलतानपूर, लखनऊ, शहाजहापूर असा प्रवास करताना बोर्डिंग किंवा डी बोर्डिंग सुविधा देखील उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी उतरून दर्शन घेऊन पुन्हा रेल्वेने प्रवास करू शकतात.

काय आहे पॅकेज ची किंमत– (Indian Railways)

वैष्णोदेवी च्या दर्शनाला जाण्यासाठी भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी खास पॅकेज ऑफर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी भेट देता येऊ शकते. त्याचबरोबर माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी दर गुरुवारी माता वैष्णोदेवी पूर्व या ट्रेनच्या माध्यमातून तुम्ही पॅकेज बुक करून प्रवास करू शकतात. या पॅकेट ची किंमत फर्स्ट क्लास साठी 15320 रुपये प्रतिव्यक्ती एवढी आहे. तर सेकंड क्लास साठी 9810 रुपये प्रति व्यक्ती तर थर्ड एसी मध्ये 8650 प्रति व्यक्ती एवढा खर्च तुम्हाला प्रवासासाठी येऊ शकतो. त्याचबरोबर प्रवासामध्ये लहान मुलं असतील तर त्यांचा देखील खर्च वेगळा लावण्यात आला आहे.

लहान मुलांसाठी एवढी आहे किंमत

वैष्णोदेवीच्या टूर्स साठी भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवाशांसाठी सुरू केलेल्या पॅकेज मध्ये पाच ते अकरा वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी 7650 रुपये प्रति मुलगा एवढा असेल. त्याचबरोबर पाच ते अकरा वर्षापर्यंत चाइल्ड विदाऊट बेड साठी 7400 रुपये पे करावे लागतील. यासोबतच प्रवाशांसाठी जय मा इन आणि यासारख्या बऱ्याच हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा देखील करण्यात येणार आहे.

ब्रेकफास्ट आणि डिनर सुविधा दिली जाईल फ्री मध्ये

वैष्णोदेवीच्या टूर्सच्या पॅकेज मध्ये तुम्हाला थर्ड एसी मध्ये प्रवास करण्याचा चान्स मिळेल. यासोबतच दोन ब्रेकफास्ट आणि दोन डिनर सुविधा देखील फ्री मध्ये देण्यात येणार आहे. यासाठी कोणतेही चार्ज घेतले जाणार नाही.