चांद्रयान 3 च्या यशानंतर आता ISRO चे मिशन शुक्रयान; मोदींची माहिती

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 चे सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले . 23 ऑगस्ट ला 6.04 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रम ने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. या सोबतच चंद्रावर जाणारा चौथा देश म्हणून आता भारत ओळखला जाऊ लागला आहे. 14 जुलैला हे चांद्रयान तीन मिशन लॉन्च करण्यात आले होते. आता Chandrayaan 3 मिशननंतर शुक्र यान मिशन लॉन्च करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली.

   

Chandrayaan 3 च्या यशस्वी लँडिंग वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या भविष्यातील काही अंतराळ मोहिमांवर माहिती दिली. यावेळी त्यांनी आदित्य एल 1 यासोबतच शुक्र यान प्रक्षेपित होणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार शुक्र ग्रहाच्या अभ्यासासाठी हे यान पाठवण्यात येणार आहे. यानुसारच आता नासा आणि बरेच देश शुक्रावरच्या अंतराळ मोहिमेची तयारी करत आहेत.

हा आहे शुक्रयानाचा मुख्य उद्देश

पृथ्वीच्या बाहेर असलेल्या जीवसृष्टीचा शोध घेणे हा अंतराळ मोहिमेचा मेन उद्देश आहे. त्यानुसार मंगळ ग्रहावर जीवसृष्टी आणि पूरक वातावरण असण्याची शक्यता वैज्ञानिकांना होती. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये मंगळावर जीवसृष्टी असल्याची आणि निर्माण होण्याची शक्यता कोणत्याच अँगलने मिळत नाही. त्यातच आता पृथ्वीच्या जवळचा दुसरा ग्रह म्हणजे शुक्र. हा ग्रह जीवसृष्टीसाठी प्रतिकूल मानला जात आहे. म्हणूनच वैज्ञानिक शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी एका अभियानाची सुरुवात करत आहे. आणि दुसऱ्या बाजूने इस्रो शुक्रयान हे मिशन आखत आहे. या मिशनवेळी व्हीनस ऑर्बिटर शुक्रावर पाठवण्यात येईल.

शुक्र यानाच्या मार्फत या गोष्टींचा अभ्यास केला जाईल

हे शुक्रयान शुक्र ग्रहाच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणाचा अभ्यास करेल. त्याचबरोबर शुक्राचा पृष्ठभाग, वातावरणाचे रसायन, त्यांची संरचना, सौर वादळ, शुक्रावर होणारे वातावरणीय बदल या सर्वांचा अभ्यास शुक्रियानाच्या मार्फत करण्यात येईल. या मिशनवर काम आत्ता नाही तर 2017 पासून सुरू आहे. शुक्र यान ही संकल्पना 2012 मध्येच आली होती. त्यानंतर 2017 मध्ये या मिशनसाठी निधी मिळाला. आणि 2017 ला हे काम सुरू झालं. परंतु कोरोना महामारीमुळे चांद्रयान गगन यांसोबत शुक्रयान ही मोहीम देखील पुढे ढकलण्यात आली.

शुक्र यान लॉन्चिंग डेट

हे शुक्रयान मिशन केव्हा लॉन्च करण्यात येईल हे अजूनही सांगण्यात आलेले नाही. परंतु इस्रोच्या मते शुक्र यान मोहीम 2031 पर्यंत पुढे होऊ शकते. यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही. रुद्र यानाच्या लॉन्चिंग साठीची योग्य वेळ दर 19 महिन्यांनी येते. यानुसार इस्रोकडे शुक्र यानाच्या लॉन्चिंगसाठी 2026 ते 2028 पर्यंतचा कालावधी उपलब्ध आहे.