Ola S1 Air ची डिलिव्हरी सुरू; पहा किंमत आणि फीचर्स

टाइम्स मराठी । प्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Ola ने आपल्या नव्या इलेक्ट्रिक स्कुटर Ola S1 Air ची डिलिव्हरी सुरू केली आहे. ओलाची ही आत्तापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर आहे. या इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत 1.10 लाख रुपये असून आत्तापर्यंत तब्बल 50000 पेक्षा जास्त गाडयांचे बुकिंग झाले असल्याची माहिती कंपनीने दिले आहे. आज आपण Ola S1 Air चे फीचर्स आणि रेंज याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

   

151 KM पर्यंत रेंज-

Ola S1 Air मध्ये कंपनीने 3.0 kWh पॉवर चा बॅटरी पॅक दिला आहे. तसेच यामध्ये 8.5 kW क्षमतेची मोटर असून ही मोटर 58 NM टॉर्क जनरेट करते. Ola S1 Air ची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ५ तासांचा वेळ लागतो. परतू एकदा फुल्ल चार्ज केल्यानंतर ओलाची ही इलेक्ट्रिक स्कुटर तब्बल 151 किलोमीटरपर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. त्यामुळे लांबचा प्रवास सुद्धा तुम्ही या स्कुटरच्या माध्यमातून अगदी आरामात करू शकता. याशिवाय Ola S1 Air
चे टॉप-स्पीड 90 किलोमीटर प्रति तास असून अवघ्या 3.3 सेकंदात ही इलेक्ट्रिक स्कुटर 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवते.

अन्य फीचर्स – Ola S1 Air

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत. गाडीच्या अन्य फीचर्सबाबत सांगायच झाल्यास, यामध्ये ड्युअल प्रोजेक्टर हेड लॅम्प, दोन्ही चाकांवर ड्रम ब्रेक, टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, मागील ट्विन शॉक ऍब्सरबर, स्मार्टफोनसह 7-इंचाचा TFT डॅशबोर्ड आणि GPS कनेक्टिव्हिटी मिळते. तुम्ही Ola S1 Air 6 वेगवेगळ्या रंगांमध्ये खरेदी करू शकता. ज्यामध्ये स्टेलर ब्लू निऑन, पोर्सिलेन व्हाइट, कोरल ग्लॅम, लिक्विड सिल्व्हर आणि मिडनाईट ब्लू यांचा समावेश आहे.

कोणकोणत्या गाड्यांशी होणार सामना –

भारतीय बाजारात Ola S1 Air ही इलेक्ट्रिक स्कुटर बजाज चेतक, Honda Activa 6G, Ather 450X, TVS iQube यांसारख्या इलेक्ट्रिक स्कूटरला तगडी फाईट देईल.