कामावर निघालेल्या मुलीला जेवू घालण्यासाठी बापाची घाई; Video पाहून व्हाल भावूक

टाइम्स मराठी | कुटुंबाचा आधार स्तंभ म्हणून वडिलांकडे पाहिले जाते. तर मुलीला सर्वात जास्त जीव लावणाऱ्या व्यक्तीमध्ये देखील वडिलांचेच नाव घेतले जाते. वडील आपल्या मुलांविषयी प्रेम व्यक्त करत नसले तरी त्यांचे काळजी ही प्रत्येक वेळा त्यांच्या कृतीतून दिसून येते. अश्याच एका प्रेमळ वडिलांचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वडील आपल्या मुलीला खास भरवताना दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून अनेकजण भावूक होत आहेत.

   

इंस्टाग्राम या सोशल प्लॅटफॉर्मवर बिहारमधील इंडिगो एअरहोस्टेस पूजा बिहानी शर्माने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ दिसत आहे की, पूजा बिहानी आपल्या कामावर जाण्यासाठी तयार होत आहे. ती आरशासमोर राहून मेकअप करत आहे. याचवेळी तिचे वडील तीला आपल्या हाताने जेवू घालत आहेत. तिला घास भरवण्यासाठी तिच्या मागे जात आहेत. या व्हिडिओमध्ये पूजाच्या वडिलांचे प्रेम आणि त्यांची काळजी दिसून येतं आहे.

पूजा बिहानी शर्माने हा व्हिडिओ शेअर करत, “बाबा, तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात. मला माहित आहे की मी ते नेहमी हे बोलत नाही, म्हणून मी आज ते आवर्जून सांगेन: बाबा, प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद. तुम्ही जिथे असाल तिथे माझे घर आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे पापा” असे म्हणले आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट केले आहेत. तर खास करून तिच्या वडिलांचे कौतुक केले आहे.
आता या व्हिडिओला १२.५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर पुजा आणि तिच्या वडिलांचा हा व्हिडिओ खूपच चर्चेत आला आहे. अनेकांनी या व्हिडिओला आपल्या अकाउंटवरून शेअर केले आहे. तर काहींनी पूजा तू खूप भाग्यवान आहेस, मला माझ्या वडिलांची आठवण आली अशा कमेंट्स या व्हिडिओ वर केल्या आहेत. या व्हिडिओने अनेकांना भावूक करून सोडले आहे.