सप्टेंबरमध्ये 5 ग्रह आपली दिशा बदलणार; या 4 राशींच्या लोकांना होणार मोठा फायदा

टाइम्स मराठी । 4 सप्टेंबरला शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्याच दिवशी गुरुदेखील मेष राशीमध्ये प्रतिगामी होईल. असं वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. प्रत्येक ग्रह हा ठराविक वेळेच्या अंतराने राशी बदलत असतो. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यामध्ये बरेच मोठे ग्रह एकत्र येऊन एका राशीतुन मधून दुसऱ्या राशीमध्ये प्रस्थान करणार आहेत. यामध्ये गुरू, शुक्र, मंगल, बुध, सूर्य या ग्रहांचा सहभाग असेल.

   

वैदिक शास्त्रानुसार, 4 सप्टेंबरला शुक्र ग्रह हा कर्क राशीमध्ये संध्याकाळी 6.17 मिनिटांनी प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर गुरु ग्रह हा देखील संध्याकाळी 4.58 मिनिटांनी मेष राशीमध्ये वक्री होणार आहे. त्याचबरोबर 16 सप्टेंबर 2023 ला बुध ग्रह हा 1.21 मिनिटांनी सिंह राशीमध्ये प्रवेश करेल. एवढेच नाही तर सूर्यग्रह देखील 17 सप्टेंबरला 1.20 मिनिटांनी कन्या राशि मध्ये प्रस्थान करेल. आणि मंगळ ग्रह 24 सप्टेंबरला संध्याकाळी 6.26 मिनिटांनी कन्या राशि मध्ये अस्त होईल. या ग्रहांमुळे बऱ्याच राशींवर प्रभाव दिसेल. जाणून घेऊया कोणत्या राशीमध्ये काय बदल घडतील.

मेष – मेष राशीच्या लोकांना ग्रहांच्या संक्रमणामुळे बरेच फायदे होऊ शकतात. मेष राशींच्या व्यक्तींना गुरु राहूची स्थिती आणि मंगळाची दृष्टी आशीर्वाद देईल. या राशींच्या लोकांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये सहकार्य मिळेल. या काळात कोणाशी देखील वादात वेळ वाया घालवू नका. नाहीतर तुमचे नुकसान होऊ शकते. या काळामध्ये उत्पन्नामध्ये वाढ होईल. त्याचबरोबर व्यवसायात देखील यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले काम मार्गी लागू शकते.

तूळ – सप्टेंबर महिना तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ असणार आहे. त्यांना या काळात नवीन गाडी प्रॉपर्टी खरेदी करण्याचा चान्स मिळेल. त्याचबरोबर या राशीतील व्यापाऱ्यांसाठी देखील हा काळ अनुकूल राहील. व्यवसायामध्ये बरेच लाभ मिळतील. करिअरमध्ये देखील चांगले परिणाम दिसून येतील. या महिन्यांमध्ये या राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती ही चांगली असणार आहे. परंतु देवाण- घेवाण करताना सावधानी बाळगा.

सिंह – सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांच्या परिवर्तनामुळे सिंह राशींच्या व्यक्तींवर उत्तम प्रभाव दिसून येईल. या काळात त्यांचे भाग्य उजळेल. त्यांचे नशीब सुद्धा त्यांना साथ देईल. या राशींच्या व्यक्तींचे एखादे काम अडकलेले असेल तर ते देखील पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर परिवारामध्ये सुख-समृद्धी येईल.

मकर – मकर राशीच्या व्यक्तींवर ग्रहांचा चांगला परिणाम दिसून येईल. हे ग्रह परिवर्धन त्यांच्यासाठी लकी साबित होऊ शकते. या काळात तुम्हाला विदेश यात्रा करण्याचे चान्सेस मिळू शकतात. मानसन्मान मिळेल. धन देखील तुम्हाला या काळात मिळू शकते.